नाशिक: ‘वर्क फ्रॉम होम’चे आमिष दाखवून साडे सात लाख रुपयांची फसवणूक

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): सायबर पोलिस ठाण्यात घरबसल्या कामाचे आमिष दाखवून साडे सात लाख रूपयांना गंडा घातल्याप्रकरणी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाईन पैसे भरण्यास भाग पाडून ही फसवणुक करण्यात आली आहे. इंदिरानगर येथील एका व्यक्तीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

संधान गेल्या ऑगष्ट महिन्यात इंटरनेटवर घरबसल्या कामाचा शोध घेत असतांना ९९८२०७१६०० या व्हॉटसअप क्रमांकधारकाने त्यांच्याशी संपर्क साधला होता

 यावेळी त्यांना घरबसल्या कामाची माहिती देण्यात आली. फिर्यादीचा विश्वास संपादन करून भामट्यांनी त्यांना कामाबरोबरच या व्यवसायात गुंतवणुक केल्यास जास्तीचा मोबदला मिळेल असे आमिष दाखविल्याने ही फसवणुक झाली.

हे ही वाचा:  नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; अशी आहे तयारी...

दि.१९ ते २१ ऑगष्ट दरम्यान त्यांना यु स्माल फायनान्स, येस बँक, पंजाब नॅशनल बँक व युपीआय आणि टेलीग्राम आयडीच्या माध्यमातून तब्बल ७ लाख ४७ हजार ७७९ रूपयांची गुंतवणुक करण्यास भाग पाडण्यात आले. एक दीड महिना उलटूनही काम अथवा गुंतवणुकीचा मोबदला न मिळाल्याने संधान यांनी संशयितांशी संपर्क साधला मात्र तो होवू न शकल्याने फसवणुक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शेख करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790