नाशिक: ‘त्या’ आमदारांची माहिती जाहीर करा- दादा भुसे

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील अवैध धंद्याना प्रोत्साहन देण्यात कुणी आमदार आहेत, अशी जर नाना पटोले यांच्याकडे जादा माहिती असेल तर त्यांनी ती जाहीर करावी. सरकारवर विश्वास असेल तर पोलिसांत तक्रारही करावी असे आव्हान पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोक्सो प्रकरणात सहआरोपी करण्याची धमकी; पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

जिल्ह्यातील एमडी ड्रग्ज कारखान्यांवर कारवाई झाल्यानंतर अवैध धंद्याचा विषय पुन्हा चर्चेला आला आहे.

नाना पटोले यांनी केलेल्या आरोपाविषयी पालकमंत्री भुसे यांना विचारले असता, पटोले यांच्याकडे अतिरिक्त माहिती असेल तर त्यांनी प्रसारमाध्यमांना किंवा पोलिसांना द्यावी.

यात जर कोणी आमदार असतील पटोले यांनी वाट न पाहता माहिती समोर आणावी. त्यांना सरकारवर विश्वास असेल तर त्यांनी पोलिसांत तक्रार द्यावी असे आव्हान दिले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790