नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): देवळाली रोडवरील आलेल्या श्री रेणुका माता मंदिरात नवरात्र उत्सवाचा तयारीला वेग आला आहे. देवीच्या मूर्तीचे रंग काम करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे आहे.
नवरात्रोत्सवात या मंदिरात दर्शनासाठी जिल्ह्याभरातून येत असतात. भाविकांच्या सुविधेसाठी पहाटे ३ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत खुले असणार असल्याची माहिती पुजारी कविता चिंगरे यांनी दिली.
नवरात्रोत्वात या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेत विशेष नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना नवरात्रोत्सव काळात रोज २१ तास दर्शन घेता येणार आहे. महिला व पुरुष यांच्यासाठी वेगवेगळ्या दर्शन रांगा तयार करण्यात येणार असून मंदीर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने २० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. घटी बसणाऱ्या महिलांसाठी मंदिर परिसरात राहण्याची व स्नानगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.
जे भाविक आरती व अभिषेकास उपस्थित राहू शकत नाही त्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह दर्शनाची सुविधा देण्यात आली आहे. या वर्षी मंदिराचे पूजारी चंद्रकांत चींगरे यांचा पूजेचा मान असून उत्सव पार पाडण्यासाठी पूजारी कविता चिंगरे परिश्रम घेत आहे.