नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात शनिवार (ता. ७)पासून पाच दिवस हवामान स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे वर्तविण्यात आली आहे.
त्याचवेळी हवामानशास्त्राच्या अभ्यासकांनी राज्यात १० ते १५ ऑक्टोबरला परतीचा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली. शिवाय बंगालच्या उपसागरातील छोट्या वादळामुळे दिवाळीत १० ते १५ नोव्हेंबरच्या दरम्यान एक दिवस पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
परतीचा पाऊस शंभर मिलिमीटरपर्यंत अपेक्षित असल्याचे हवामानशास्त्र अभ्यासकांचे म्हणणे आहे. शिवाय दिवाळीत २५ मिलिमीटरपर्यंत पावसाची त्यांनी शक्यता वर्तवली. जिल्ह्यात आता पाच दिवस अंशतः ढगाळ ते निरभ्र आकाश राहील.
तापमान कमाल ३१ ते ३४, किमान १९ ते २१ अंश सेल्सिअस, वाऱ्याचा वेग तासाला सात ते नऊ किलोमीटर राहण्याची शक्यता आहे.