नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या एक वर्षाच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. गोविंदनगर येथील डेटामॅटिक्सजवळील पुलावर दोन्ही बाजूला महापालिकेतर्फे संरक्षक जाळी बसविण्याच्या कामाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसह नंदिनी नदीचे प्रदूषण कमी होण्याला यामुळे मदत होणार आहे.
डेटामॅटिक्सजवळ मुंबई नाका येथे नंदिनी नदीवरील या पुलावर संरक्षक जाळ्या बसवाव्या, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने प्रभाग २४ मधील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली होती. महापालिकेच्या गोदावरी संवर्धन विभागाच्या ‘गोदावरी साफसफाई संबंधित इतर विकासकामे’ या सदरातून यासाठी निधी मंजूर करण्यात आला.
बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांनी तत्कालीन आयुक्त, गोदावरी संवर्धन कक्षाचे उपायुक्त, तसेच बांधकामचे शहर अभियंता यांची वेळोवेळी भेट घेवून प्रस्तावास मान्यता मिळवून घेतली. निविदा निघाल्यानंतर अंतिम प्रशासकीय मंजुरी व काम सुरू करण्याचा आदेश निघेपर्यंत पाठपुरावा केला.
काम त्वरित सुरू करावे यासाठी सुद्धा निवेदन दिले. आज गुरुवारी, ५ ऑक्टोबरपासून या कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे नंदिनी नदीत घाण, कचरा टाकण्यास प्रतिबंध होणार आहे, नागरिकांच्या जीविताचेही रक्षण होणार आहे.
सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भालचंद्र रत्नपारखी, विनोद पोळ, निलेश ठाकूर, प्रकाश दुसाने, संकेत कुलकर्णी, चिन्मय वराडे, गोरख नेरे, विजय उपाध्ये, नीलेश येवला, दिलीप निकम, बापूराव पाटील, डॉ. शशीकांत मोरे, भारती देशमुख, उज्ज्वला सोनजे, वंदना पाटील, अशोक पाटील, बाळासाहेब राऊतराय, बाळासाहेब देशमुख, राजेंद्र कानडे, मनोज वाणी, दीपक दुट्टे, सचिन राणे यांच्यासह प्रभाग २४ मधील नागरिकांनी महापालिकेचे आभार मानले आहेत.
यापूर्वी दोंदे पुलावर केले काम: शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या प्रयत्नाने यापूर्वी म्हसोबा महाराज मंदिराजवळील दोंदे पूल, तसेच सिटी सेंटर सिग्नलकडून गोविंदनगरकडे जाणार्या रस्त्यावरील पुलावर मागील वर्षी संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या आहेत.