नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): ऑनलाईन तांदूळ व्यापाऱ्याची संपर्क्र क्रमांक शोधून व्यवहार करणे नाशिकच्या व्यापाऱ्यांच्या अंगलट आले असून, त्यांची ८ लाखांची फसवणूक झाली.
धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय असलेल्या व्यापाऱ्याने ३५ टन तांदूळ खरेदीचे साडेआठ लाख रुपये दिल्यानंतरही माल न पोहोचल्याने फसवणूक झाल्याचे समोर आले. याप्रकरणी पश्चिम बंगालच्या संशयिताविरोधात इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूरजकुमार चौधरी (रा. सिलीगुडी बाजार, दार्जिलिंग, पश्चिम बंगाल) असे संशयिताचे नाव आहे. नारायण बापू चांदवडकर (रा. नंदनवन सोसायटी, श्रद्धाविहार कॉलनी, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, चांदवडकर यांचा धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे.
त्यांनी मोठ्या प्रमाणात तांदूळ खरेदीसाठी ऑनलाइन सर्च केले. त्यावेळी पश्चिम बंगालमधील संशयित चौधरी याचा संपर्क क्रमांक मिळाला. त्याच्याशी फोनवरुन झालेल्या संवादातून दोघांमध्ये ३५ टन तांदुळाचा व्यवहार ठरला.
त्यानुसार चांदवडकर यांनी चौधरीला ८ लाख ५२ हजार रुपये ऑनलाइन पाठविले. त्यानंतर तांदूळ चांदवडकर यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत. त्यांनी पुन्हा संपर्क साधले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली.
त्यावरुन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी संशयितांविरोधात फिर्याद दिली. सदरचा प्रकार २० ऑगस्ट ते २ ऑक्टोबर या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुनहा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक भूषण सोनार हे करीत आहेत.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790