नाशिक: जन्मदात्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमाला अटक

नाशिक (प्रतिनिधी): पत्नी घरात नसल्याची संधी साधून संशयित नराधम बापाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक उपनगरातील कॅनॉल रोड भागात घडली आहे.

याप्रकरणी उपनगर पोलिसात पॉक्सोसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन मुलीने आईच्या फिर्यादीनुसार, त्या खासगी नोकरी करीत असल्याने रात्रपाळी नोकरीनिमित्त घराबाहेर होत्या. ही संधी साधत या नराधमाने अल्पवयीन मुलीच्या एकटेपणाचा फायदा घेत १२ ते २० सप्टेंबर दरम्यान रात्रीच्या वेळी लैंगिक अत्याचार केले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गोविंदनगर येथील संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाकडून पूरग्रस्तांसाठी ५२ हजारांचा धनादेश जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द

संशयिताचा अतिरेक वाढल्याने अल्पवयीन मुलीने हा प्रकार आईकडे कथन केल्याने तिने पतीविरोधात तक्रार दिली आहे.

त्यानुसार संशयित बापावर पॉक्सोसह अन्य कलमान्वये गुन्हा नोंद झाला आहे. कॅनल रोडवरील आम्रपाली नगर भागात ही घटना घडली. पोलिसांनी संशयित बापास अटक केली असून तपास पोलिस निरीक्षक दुकळे करीत आहेत.

(टीप: आरोपी हा मुलीचा पिता आहे, बातमीत त्याचे नाव टाकल्यास पीडितेची ओळख उघड होते. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपीच्या नावाचा उल्लेख बातमीत हेतुपूर्वक केलेला नाही.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

here