नाशिक (प्रतिनिधी): बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण करुन खंडणी उकळणाऱ्या चार जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. या आरोपींकडून खंडणी स्वरूपात मागीतलेल्या रक्कमेपैकी १,३३,००,०००/- (एक कोटी तेहतीस लाख) रोख रक्कम, गुन्हयात वापरलेली बोलेरो कॅप्मर गाडी, देशी बनावटीचा कटटा, सहा जिवंत राउंड असा ८,३२,५००/- रूपये असा एकूण १,४१,३२,५००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्हे शाखा युनिट क्र. १ ने या संपूर्ण प्रकरणाता पर्दाफाश केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत नाशिक शहर पोलिसांनी आज (दि. १३ सप्टेंबर २०२३) पत्रकार परिषद घेतली.
यावेळी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २ सप्टेंबर रोजी अक्षय धैर्यसिंग देशमुख, रा- इंदिरानगर नाशिक यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती की, त्याचे पार्टनर हेमंत पारख यांचे राहते घरासमोरुन अनोळखी इसमांनी पिस्टलचा धाक दाखवुन त्यांना गाडीत बळजबरीने फोर व्हिलर गाडीत टाकुन अपहरण करून त्यांना दोन कोटी रूपयाची खंडणी मागितली होती.
त्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाच्या घटनास्थळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप आयुक्त गुन्हेशाखा प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त परिमंडळ – २ श्रीमती मोनिका राउत, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सिताराम कोल्हे, यांनी गुन्हा उघडकिस आणण्याबाबत वेळोवेळी सुचना व मार्गदर्शन केले होते.
सदर गुन्हा उघडकिस आणण्यासाठी गुन्हेशाखा युनिट क्र. १ व २ तसेच इंदीरानगर पो.स्टे कडील एक पथक, खंडणी विरोधी पथक, असे आरोपींच्या शोधार्थ नेमण्यात आले होते. गुन्हे शाखा युनिट क्र. १ यांनी अहोरात्र परीश्रम करून घटनास्थळावरील तसेच वाहन ज्या मार्गाने गेले त्या भागातील सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी केली होती.
सदर गुन्हयात गुन्हे शाखा युनिट क्र. १ यांनी केलेल्या सी.सी.टी.व्ही फुटेज व तांत्रिक माहीतीच्या आधारे आरोपी हे जोधपूर राज्यस्थान भागातील असल्याची माहीती मिळाली तसेच आरोपी महेंद्र बिष्णोई याने त्याचे राजस्थान येथील साथीदार यांच्या मदतीने हेमंत पारख अपहरण करून खंडणी उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले. मुख्य आरोपी व त्याचे राजस्थान मधील साथीदार यांचा शोध घेणे कामी वपोनि ढमाळ यांनी गुन्हे शाखा युनिट क. १ कडील सपोनि हेमंत तोडकर, सहा. पोउपनि रविंद्र बागुल, पोहवा नाजीम पठाण, पोना विशाल काठे, विशाल देवरे, विशाल मरकड, असे पथक तयार करून पाठविले होते.
सदर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सतत तीन दिवस अहोरात्र मेहनत करून संशयीत इसम नामे १) महेन्द्र उर्फ नारायणराम बाबूराम बिष्णोई वय ३० वर्ष रा. मोर्या, तहसिल लोहावत, जिल्हा जोधपुर राजस्थान, २) पिंटू उर्फ देविसग बद्रीसिंग राजपूत वय २९ वर्ष रा. राजेंद्रनगर, जिल्हा पाली राजस्थान, ३) रामचंद्र ओमप्रकाश बिष्णोई वय २० वर्ष रा. गावं फुलसरा छोटा, तहसिल बजू, जिल्हा बिकानेर, राजस्थान यांना ७ सप्टेंब रोजी ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. तसेच तपासात सदर गुन्हयाचा मास्टर माईन्ड हा नाशिक शहरातील अनिल भोरू खराटे वय २५ वर्ष रा. लहानगेवाडी, पोस्ट वाडीव-हे ता. इगतपूरी, जि. नाशिक असल्याचे व त्याने सदर गुन्हयातील मुख्य आरोपी महेंद्र बिष्णोई व त्याचे साथीदार यांचे मदतीने सदर गुन्हयाचा कट रचल्याचे व हेमंत पारख यांच्या बाबत इतंभुत माहीती पुरविली होती असे निष्पन्न झाल्याने त्यालाही तात्काळ ताब्यात घेवून सदर गुन्हयामध्ये ८ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे.
सदरचा गुन्हा गंभार व क्लिस्ट असल्याने पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सदर गुन्हयाचा तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ गुन्हे शाखा युनिट क्र. १ यांच्याकडे दिला. वपोनि विजय ढमाळ यांनी, सपोनि सुर्यवंशी, सहा. पोउपनि रविंद्र बागुल, पोहवा नाजीम पठाण, पोना विशाल काठे, विशाल देवरे, विशाल मरकड, राहुल पालखेडे, योगेश चव्हाण या तपास पथकासह जि. फलोदी राज्य राजस्थान येथील भारत-पाकीस्तान सिमा लगत वाळवंट भागातील निर्मनुष्य वस्तीत जावुन अटक आरोपीतांकडून खंडणी स्वरूपात मागीतलेल्या रक्कमेपैकी १,३३,००,०००/- (एक कोटी तेहतीस लाख) रोख रक्कम, गुन्हयात वापरलेली बोलेरो कॅप्मर गाडी, देशी बनावटीचा कटटा, सहा जिवंत राउंड असा ८,३२,५००/- रूपये असा एकूण १,४१,३२,५००/- रू किंमतीचा मुददेमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे.
सदर गुन्हयात वर नमुद ०४ ही आरोपीतांना ८ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली असून त्यांना १५ सप्टेंबर रोजी पावेतो पोलीस कोठढी देण्यात आली आहे. सदर गुन्हयात मुख्य आरोपी याच्या सोबत हेमंत पारख अपहरण करण्याच्या कटा मध्ये आणखीन ०३ पाहीजे आरोपी निष्पन्न झाले असुन त्यांचे अटके बाबत तपास चालु आहे.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप आयुक्त सो. गुन्हे प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, रणजीत नलावडे, सपोनि हेमंत तोडकर, सपोनि प्रविण सुर्यवंशी, पोउपनि चेतन श्रीवंत, पोउपनि विष्णू उगले, सपोउनि रविंद्र बागुल, नाजिम पठाण, पोना विशाल काठे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, तसेच गुन्हे शाखेकडील सहा. पोउपनि सुगन साबरे, पोहवा येसाजी महाले, पोहवा शरद सोनवणे, पोअं. प्रदीप म्हसदे, मुख्तार शेख, आप्पा पानवळ, राहूल पालखेडे, महेश साळूंके, राजेश राठोड, जगेश्वर बोरसे चालक सहा. पोउपनि किरण शिरसाठ अशांनी केली आहे.
![]()


