Live Updates: Operation Sindoor

नाशिक पोलिसांची धडक कारवाई; ‘म्हसरुळ-धात्रक गॅंग’मधील गुन्हेगारांच्या टोळीला मोक्का

नाशिक (प्रतिनिधी): पोलिस आयुक्त यांनी धडक कारवाई करत म्हसरुळमधील धात्रक गॅंगच्या गुन्हेगारांना मोक्का लावला आहे.

ही टोळी संघटीतरित्या घातक हत्यारे जवळ ठेवून नाशिक शहरातील म्हसरुळ, पंचवटी, उपनगर, भद्रकाली, व नाशिक तालुका इ.पोलीस ठाणे हददीत लोकांना अवैधरित्या शस्त्र बाळगुन धमकावुन मारहाण करणे, खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, अपहरण करणे, दंगा करणे, घातक शस्त्रानिशी दंगा करणे, या प्रकारे परिसरात गुन्हे करुन टोळीची दहशत निर्माण केली. त्यामुळे या टोळीविरुध्द कडक पाऊल उचलत मोक्का लावण्यात आला आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक शहर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन: ८० गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती; ४२ ताब्यात

म्हसरुळ पोलीस स्टेशन दाखल गुन्ह्यात निष्पन्न ४ आरोपींविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ (मोक्का) या कायद्यान्वये कारवाई करण्याचे ७ सप्टेंबर रोजी आदेश निर्गमीत करून दहशत निर्माण करणा-या आरोपींविरूध्द कठोर कारवाईचे पावले उचलण्यात आली आहेत.

सदर गुन्हयाचे तपासात गुन्हयातील मुख्य आरोपी व गुन्हेगारी टोळीचा सुत्रधार गणेश बाबुराव धात्रक हा गुंड प्रवृत्तीचा असुन त्याने त्याचे साथीदार दर्शन गोरख गायकवाड, रा. राममंदिर मागे, मातोरी, ता. जि. नाशिक, अभिषेक अनिल गिरी, रा. स्वामी विवेकानंदनगर म्हसरुळ नाशिक, आकाश पांडुरंग चारोस्कर, रा. मातोरी, कोळीवाडा, ता. जि. नाशिक यांच्यासह इतर साथीदार यांनी मिळुन गुन्हेगारी टोळी निर्माण केली. त्यातून ते गुन्हे करत होते.

👉 हे ही वाचा:  यंदा मान्सूनचे लवकर आगमन – १३ मेपूर्वी अंदमानात प्रवेश, महाराष्ट्रातही लवकर हजेरीची शक्यता

या टोळीचे प्रमुख मुख्य आरोपी गणेश बाबुराव धात्रक याने गुन्हा करतांना टोळीतील सदस्यांच्या सहाय्याने हिंसाचाराचा, अवैध शस्त्रांचा वापर करून धाकदपटशा दाखवुन परिसरात वर्चस्व निर्माण करून स्वतःची व टोळीची दहशत कायम ठेवण्यासाठी बेकायदेशीर कृत्य चालु ठेवलेले आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: अल्पवयीन मुलांना हाताशी धरून चेनस्नॅचिंग; चार लाखांचे सोने केले जप्त

सदर टोळीतील सदस्यांविरूध्द एकुण १७ गुन्हे म्हसरुळ, पंचवटी, उपनगर, भद्रकाली, व नाशिक तालुका इ. पोलीस ठाणे अंतर्गंत दाखल झालेले आहेत.

नाशिक शहरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करुन दहशत निर्माण केल्याने नाशिक शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी मोक्का कायदयान्वये पाचव्या गुन्हेगारी टोळीस जेरबंद करुन ठोस प्रतिबंधक कार्यवाही केल्यामुळे नाशिक शहरातील नागरीकांनी सदर कार्यवाही बाबत समाधान व्यक्त केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790