नाशिक: साखर झोपेत काळाचा घाला, घराचा स्लॅब कोसळून 3 वर्षीय नातूसह आजोबा ठार

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्याील नळवाड पाडा येथे गुरुवार ७ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घराचा स्लॅब कोसळून आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तर यात एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे.

दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा येथे गुरुवार, ता. ७ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घराता स्लॅब कोसळून तीन वर्षीय बालकासह एक जण ठार तर एक वृध्द महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली माहीतीनूसार नळवाड पाडा, ता. दिंडोरी येथे गुरुवार, ता. ७ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास नऴवाडपाडा येेथील गुलाब वामन खरे यांच्या घराचा स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना घडली.

सदरचा स्लॅब भर झोपेत असलेल्या: विठाबाई वामन खरे (वय ८०), गुलाब वामन खरे (६० वर्ष), निशांत खरे (३ वर्ष) यांच्या अंगावर पडल्याने यात गुलाब वामन खरे ६० वर्ष, निशांत विशाल खरे (३ वर्ष) या बालकाचा मृत्यु झाला असून विठाबाई खरे ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

घटनेची माहीती मिळताच नऴवाड पाडाचे सरपंच हिरामण गवळी यांनी आपल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह व काही ग्रामस्थांनी धाव घेतली. यावेळी १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केल्यानंतर वणी ग्रामिण रुग्णालयातंतर्गत असलेल्या १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. योगेश मांटे व रुग्णवाहिका चालक राजेश परदेशी यांवी घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान स्लॅबचा मोठा भाग पडलेला असल्यामूऴे सरपंच हिरामण गावीत यांनी जेसेबी बोलावून मदत कार्यास सुरुवात केली.

दरम्यान वृद्द महिलेचा घराच्या एका बाजूकडून ओरडण्याचा आवाज येत असल्याने सरपंच हिरामण गावीत, ग्रामपंचायत शिपाई बाळु गवळी यांनी पाहाणी करुन प्रसंगावधान राखून आवाजाच्या दिशेने हाताने स्लॅबचा मलबा हटवित विठाबाई खरे यांना बाहेर काढले असून त्या जखमी आहेत.

तर गुलाब वामन खरे ६० वर्ष, निशांत विशाल खरे ३ वर्ष हे स्लॅबखाली पूर्णपणे दाबले गेल्याने त्यांचे डोके व शरीर पूर्ण दाबले गेल्याने जागीच मृत्यु झाला आहे. जखमी विठाबाईस उपाचारासाठी व मृतांना शवविच्छेदनासाठी दिंडोरी ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले आहे.

घटनेची तहसिलदार पंकज पवार, नायब तहसिलदार तांबे यांनी माहीती घेवून रात्रीच मंडल अधिकारी व ग्रामसेविका ललीता खांडवी घटनास्थळी प्रशासनाच्यावतीने दाखल झाले होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790