नाशिक: जीएसटीचा लाचखोर अधिकारी जाळ्यात; 40 हजारांची लाच घेताना अटक

नाशिक (प्रतिनिधी): जाहिरात चित्रीकरणासाठी आलेले वाहने जीएसटीचा दंड न भरता सोडून दिल्याच्या मोबदल्यात ४० हजारांची लाच स्वीकारलेल्या राज्य कर अधिकाऱ्यास रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता ४) ही कारवाई केली.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण; काही भागांत हलक्या पावसाची शक्यता

जगदीश सुधाकर पाटील (वय ३९, रा. ९०२, एफ विंग, अनमोल नयनतारा सिटी दोन, फेज-२, कर्मयोगी नगर, नाशिक) असे अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्याचा जाहिरात चित्रीकरणाचा व्यवसाय आहे. जाहिरात चित्रीकरणाचे कामात व्यत्यय येऊन तक्रारदार यांचे पाच ते सहा लाखाचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून चित्रीकरणासाठी आलेले वाहने जीएसटीचा दंड न भरता सोडून दिल्याच्या मोबदल्यात लाचखोर पाटील यांनी ४० हजारांच्या लाचेची मागणी केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शासनमान्य ग्रंथ यादी निवडीकरिता प्रकाशित ग्रंथ 28 फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने पडताळणी केल्यानंतर सायंकाळी पाथर्डी फाटा परिसरातील विक्रीकर कार्यालयात सापळा रचला.

पाटील याने लाचेची रक्कम स्वीकारतात पथकाने त्यास अटक केली. या प्रकरणी इंदिरा नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, प्रकाश महाजन यांनी कारवाई केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790