नाशिक: पंचवटीत गॅसच्या भडक्यात महिलेचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): गॅसच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. पंधरा दिवसापूर्वी ही घटना घडली होती. भारतीबाई भरतराव सुर्यवंशी (५४ रा. हिरावाडी पंचवटी) असे मृत महिलेचे नाव आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: सुनेने मारहाण करत सासूला हाकलले; सुनेवर गुन्हा दाखल !

सुर्यवंशी यांच्यावर मुंबईनाका परिसरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारसुर्यवंशी या गेल्या १८ ऑगष्ट रोजी रात्री आपल्या राहत्या घरात गॅसवर स्वयंपाक करीत असतांना ही घटना घडली होती.

👉 हे ही वाचा:  त्र्यंबकेश्वर आता 'अ' दर्जाचे तीर्थक्षेत्र; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा !

गॅस गळती मुळे अचानक भडका उडाल्याने त्या गंभीर भाजल्या होत्या. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ मुंबईनाका येथील शताब्दी हॉस्पिटल येथे दाखल केले होते. गेली पंधरा दिवस त्या मृत्यूशी झुंज देत होत्या. रविवारी उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास जमादार वणवे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790