🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: प्रसुतीसाठी ‘सिव्हिल’मध्ये आली अन्‌ उघड झाला हा धक्कादायक प्रकार…

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या विवाहिता अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आल्याने, तिच्या पतीविरोधात पोक्सोअन्वये बलात्काराचा गुन्हा सरकारवाडा पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांमधील अशाप्रकाराचा हा दुसरा प्रकार घडला आहे. यामुळे बालविवाह आळा बसल्याच्या शासनाने केलेला दावाच फोल ठरला आहे. दरम्यान, प्रसुतीसाठी आलेल्या अल्पवयीन विवाहितेने गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक परिमंडलात ३ लाख १८ हजार घरगुती स्मार्ट; वीजबिलात ३२ लाखाची सवलत

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडिता अल्पवयीन असतांनाही तिचा गेल्या वर्षी संशयिताशी विवाह पार पडला. त्यानंतर ती गर्भवती राहिल्याने जिल्हा रूग्णालयात प्रसूतीसाठी तिला दाखल करण्यात आले.

त्यावेळी पीडितेच्या कागदपत्रांच्या पडताळणीतून ती अल्पवयीन असल्याचा गंभीर प्रकार समोर आला. प्रसुतिदरम्यान अल्पवयीन मातेने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनात झाडांसाठी आज (दि. २१) लाक्षणिक उपोषण

याप्रकरणी संशयित पती याच्याविरोधात पोक्सोअन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

दरम्यान, समाजातील बालविवाहांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा शासनाकडून केला जात असताना, गेल्या काही दिवसात दोन घटना अशाप्रकारे उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे शासनाचा दावा फोल ठरतो आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790