नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आकाशवाणी टॉवर येथून चोरी गेलेली ईनोव्हा क्रिस्टा या चार चाकी गाडीचा मध्यप्रदेश व राजस्थान या राज्यांत शोध घेऊन चारचाकीसह तिघा संशयितांना जेरबंद केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि,मयुर राजेंद्र शहाणे, (मयुर ज्वेलर्स) यांच्या मालकीची इनोव्हा क्रिस्टा कार (एम.एच. १५ एफ. यू. ६४४४ ) त्यांच्या (सहरा बंगला रोहिणीराज बंगलो, आकाशवाणी टॉवर, गंगापुररोड नाशिक) या ठिकाणी लॉक करून पार्क केली असतांना अज्ञात चोरटयांनी पुढील बाजूची काच फोडून चोरी केल्या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,उपायुक्त परिमंडळ १ किरणकुमार चव्हाण,सहाय्यक आयुक्त सिध्देश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर,सहाय्यक निरीक्षक नितीन पवार,उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, उपनिरीक्षक संजय भिसे,अंमलदार गिरीष महाले,मिलिंदसिंग परदेशी, रविंद्र मोहिते,मच्छिंद्र वाघचौरे,गोरख साळुंके, सोनु खाडे,सुजित जाधव,तुषार मंडले,थविल, नवले यांच्या पथकाने तिघा संशियतांसह चारचाकी हस्तगत केली आहे.
संशयित राजेश राधेश्याम पंडीत (३७,रा. धायतुरागाव, राम स्वरुप शाळेजवळ, तालुका जिल्हा आग्रा उत्तरप्रदेश), मनोज महेंद्र परीहार (ठाकुर) (४२, रा. नगला अहिरगाव, तहसील हाथरस जंक्शन, जिल्हा- हाथरस उत्तरप्रदेश ) इस्माईल शब्बीर अहमद खान (३७ , रा. शास्त्रीपार्क, बलुंद मस्जीदजवळ गल्ली नं १ ईस्ट दिल्ली) यांचेकडून गुन्हे उघडकीस करण्याचे कौशल्य, तांत्रिक विश्लेषण तसेच मध्यप्रदेश राज्यात गोपनीय बातमीदार तयार करून त्यांचेकडुन माहिती प्राप्त करून वरील आरोपीतांनी मध्यप्रदेश जिल्हा निमच येथे विक्रीसाठी ठेवलेली इनोव्हा क्रिस्टा ही वेळोवेळी राज्यस्थान तसेच मध्यप्रदेश राज्यात जाऊन सुस्थितीत हस्तगत केली. या प्रकरणी पुढील तपास अंमलदार गिरीष महाले करत आहेत.