नाशिक: पॅनकार्ड अपडेटच्या नावाखाली सव्वाचार लाखांची फसवणूक

नाशिक (प्रतिनिधी): पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर भामट्यांनी एकाला सव्वा चार लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

संशयिताने क्रेडिट कार्डवर पर्सनल लोन मंजूर करून ही रक्कम परस्पर लांबविली असून याप्रकरणी सायबर पोलिसात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण; काही भागांत हलक्या पावसाची शक्यता

मुकेश रमेशचंद्र सोनवणे (रा. गोविंदनगर, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या ५ तारखेला भामट्यांनी सोनवणे यांच्याशी संपर्क साधला होता. ९९५३८७५८८० या मोबाईलधारकाने दिलीप रंजन नाव असल्याचे सांगून आपण अ‍ॅक्सीस बॅकेतून बोलत असल्याचे सांगितले.

संबंधीत भामट्याने अ‍ॅक्सीस बँकेतील बचत खात्याला जोडलेले पॅनकार्ड अपडेट नसल्याचे सांगितले. सोनवणे यांचे अ‍ॅक्सीस बँकेत बचत खाते असल्याने त्यांनी काय करावे लागेल, अशी विचारणा केली असता संबंधीताने तात्काळ अपडेटसाठी मोबाईलमध्ये अ‍ॅक्सीस डॉट एपीके अ‍ॅप्लीकेशन इन्स्टॉल करण्यास सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डा‍क विभागाची 2 फेब्रुवारीला पेन्शन अदालत; निवृत्तीवेतनधारकांनी 28 जानेवारीपर्यंत करावेत अर्ज

सोनवणे यांनी अ‍ॅप्लीकेशन इन्स्टॉल करताच भामट्याने सोनवणे यांच्या क्रेडिट कार्डची माहिती मिळवत त्यावर ४ लाख १८ हजार रूपयांचे तात्काळ पर्सनल लोन मंजूर करून घेतले.

त्यातील ४ लाख १५ हजार ९८५ रूपयांची रक्कम सोनवणे यांच्या बचत खात्याच्या माध्यमातून अन्य खात्यांवर परस्पर वर्ग करून ही आर्थिक फसवणुक केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांच्या हस्ते ध्वजारोहण

याबाबतचा संदेश प्राप्त होताच सोनवणे यांनी बॅकेत जावून पडताळणी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसात धाव घेतली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790