नाशिक (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात मूल्य आकारल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटू लागलेले आहेत. या निर्णयाला विरोध करण्यासाठी आज शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यातील व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील 14 समित्यांवरील लिलाव आज बेमुदत बंद ठेवलेले आहेत. काल झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. तर एकमेव पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलावासाठी ट्रॅक्टर आल्याचे समजते आहे. त्यामुळे येथील कांदा लिलाव सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारने कांद्याचा निर्यात शुल्क वाढवून 40 टक्क्यांवर नेल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाल्यात सरकारच्या निर्णयामुळे कांद्याच्या निर्यातीमध्ये घट होणार आहे. यामुळे पुढच्या काळात किरकोळ बाजारात कांद्याचे दर कमी होण्याची भीती आहे.
म्हणूनच केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात आणि निषेधार्थ आज पासून नाशिक जिल्ह्यातील 14 बाजार समित्या बेमुदत काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनच्या लासलगाव येथील बैठकीत निर्णय झाला. कालपासूनच अनेक ठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता थेट लिलाव प्रक्रियाच बंद ठेवण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात मूल्य आकारल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटू लागलेले आहेत. या निर्णयाला विरोध करण्यासाठी आज शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील 14 समित्यांवरील लिलाव आज बेमुदत बंद ठेवलेले आहेत. आशिया खंडामधील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणजे लासलगावची बाजार समिती ओळखली जाते. या बाजार समितीमध्ये रोजच्या रोज शेकडो ट्रक आणि टेम्पो कांदा घेऊन येतात.
कोट्यवधींचे व्यवहार होतात, आज मात्र इथे शुकशुकाट पाहायला मिळतो. लासलगाव बाजार समितीमध्ये नेहमीच शेतकरी, व्यापारी, निर्यातदार यांचा गजबजाट पाहायला मिळतो. कांदा लिलावासाठी येणारे ट्रॅक्टर, टेम्पो आदीसंह इतर वाहनांनी बाजार समिती भरलेले असते. मात्र आज पूर्णतः शुकशुकाट असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे चित्र आहे.
बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट:
नाशिकच्या लासलगाव बाजार समितीचाच विचार केला तर 96 लाख 25 हजार 838 क्विंटल वर्षभरात आवक असते, तर 9 अब्ज वीस कोटी, 49 लाख 63 हजार 978 इतकी या बाजार समितीची उलाढाल असते. यावरून लक्षात येते की लाखो शेतकऱ्यांचा उत्पादन हा कांदा असून आज मात्र लासलगाव बाजार समितीसह इतर 15 बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान होणार आहे, त्यामुळे शेतकरी संतप्त झालेला असून व्यापारीने देखील शेतकऱ्याच्या हिताचं धोरण लक्षात घेता आज संपूर्ण बाजार समित्यांमधील लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विविध ठिकाणी आंदोलने देखील केली जात आहे.