नाशिक: डोळे आल्यास विद्यार्थ्यांना सक्तीने सुटी द्या! महापालिका आयुक्तांच्या सूचना

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिक शहरात डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात फैलावत असून, विशेष करून विद्यार्थ्यांमध्ये डोळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सहा हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहे.

शुक्रवारी (ता. १८) नव्याने २८२ रुग्णांची नोंद झाली. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी विद्यार्थ्यांना डोळे आले असल्यास सक्तीने सुटी देण्याचे आवाहन शाळा प्रशासनाला केले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

राज्यात डोळ्यांची साथ सुरू आहे. महापालिका हद्दीत मागील पंधरवड्यात मोठ्या संख्येने डोळ्यांचे रुग्ण वाढले आहे. महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन, बिटको, इंदिरा गांधी रुग्णालय तसे मोरवाडी येथील श्री. स्वामी रुग्णालयात आतापर्यंत ६०८२ डोळ्यांच्या रुग्णांची नोंद झाली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: शतपावली करतांना पाय घसरून नाल्यात पडल्याने तरुणीचा मृत्यू...

त्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी आवाहन केले आहे. महापालिकेकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहे. महापालिकेच्या सर्व शाळा, खासगी शाळा व कॉलेजमधील अनेक विद्यार्थ्यांचे डोळे आले असल्याचे निदर्शनास आल्यास सक्तीने सुटी देण्यात यावी.

हे ही वाचा:  नाशिक: प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा अपघात, चार जण जखमी

जेणेकरून डोळे येण्याच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. शहरातील शाळांमध्ये नोडल ऑफिसरच्या माध्यमातून जनजागृती करावी.

विद्यार्थ्यांना डोळे आले असल्यास सक्तीची सुटी देऊन रुग्णालयात, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन तपासणी करावी, असे आवाहन डॉ. करंजकर यांनी केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790