नाशिक: फोर व्हीलर, मोबाईल चोर असणारा रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक…

गुन्हे शाखा युनिट क्र . ०१ ची कामगिरी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ०१ ने मोठ्या गुन्ह्याची उकल केली आहे. ह्या गुन्ह्याच्या उकलीमुळे सराईत गुन्हेगार हाताला लागला आहे.

मोबाईल चोरी, चार चाकी वाहनांची चोरी आणि दुचाकीची चोरी उघडकीस आली आहे.   

🔎 हे वाचलं का?:  महाराष्ट्रावर शोककळा: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन

गुन्हे शाखा युनिट क्र 01 कडील पोलिस अमलदार महेश साळुंखे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून तसेच पोलीस अंमलदार प्रशांत मरकड यांना मिळवलेल्या गुप्त बातमी नुसार रेकॉर्डवरील  गुन्हेगार किरण रमेश वाघमारे (रा. वेद मंदिर जवळ ,मुबई नाका) यास ताब्यात घेवून चोकशी केली असता, त्याच्याकडून सरकारवाडा पो ठाणे 140/23, नाशिक रोड पो ठाणे चे 273/23 असे मोबाईल चोरीचे दोन गुन्हे त्याचप्रमाणे  गंगापूर पो. ठाणे चा 202/23 हा  हुंडाई कंपनीची इऑन गाडी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डा‍क विभागाची 2 फेब्रुवारीला पेन्शन अदालत; निवृत्तीवेतनधारकांनी 28 जानेवारीपर्यंत करावेत अर्ज

सदर आरोपी कडून  हुंडाई कंपनीची इओन गाडी किंमत 2.5 लाख , ओप्पो कंपनी व सॅमसंग कंपनीचे  दोन मोबाईल किंमत 13,000 तसेच सॅमसंग कंपनीचे दोन टीव्ही किंमत 60,000,  असा चोरीचा एकूण 3,23,000 किमतीचा या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपी कडून आणखी गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने तपास चालू आहे. सदर आरोपी व मुद्देमाल यास पुढील कारवाई करीता सरकारवाडा पो ठाणे चे ताब्यात देण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790