Breaking: नाशिकचे तहसीलदार बहिरम 15 लाख रुपयांची लाच घेताना ताब्यात….

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकचे तहसीलदार नरेश कुमार बहिरम यांना 15 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.

दंड कमी करण्यासाठी बहिरम यांनी तक्रारदाराकडे 15 लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबात आता गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यातील 'या' जिल्ह्यात आता पावसाचा अलर्ट

नाशिक जिल्ह्यातील राजुर बहुला येथील तक्रारदार यांच्या जमिनीमध्ये अवैध मुरुम उत्खनन झाले होते. मुरुमाच्या मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १,२५,०६,२२०/- याप्रमाणे दंड तहसीलदार कार्यालयाने केला होता.

याविरुद्ध जमिनीच्या मालकाने  उपविभागीय अधिकारी, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डा‍क विभागाची 2 फेब्रुवारीला पेन्शन अदालत; निवृत्तीवेतनधारकांनी 28 जानेवारीपर्यंत करावेत अर्ज

त्याबाबत सुनावणी होऊन सदरचे प्रकरण पुनश्च फेर चौकशीसाठी नाशिकचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम, यांच्याकडे पाठवण्यात आले होते. ह्या प्रकरणात पडताळणी करणे कामी जमिनीची पाहणी करत असताना जमीन मालक यांच्याकडे तडजोडीअंती 15 लाख रुपये लाचेची मागणी बहिरम यांनी केली.

त्याप्रमाणे त्यांनी लाच स्वीकारली. लाच स्वीकारताना तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून गुन्हा नोंदवायची प्रक्रिया सुरू आहे. बहिरम यांनी या आधी नाशिक जिल्ह्यात कुंभमेळा काळात त्रंबकेश्वर येथे व येवला येथे तहसीलदार म्हणून काम केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790