रोडरोमिओ आणि टवाळखोरांना नाशिक शहर पोलीसांचा दणका; 71 जणांवर कारवाई

नाशिक (प्रतिनिधी): पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशाने आज शहरातील सर्व पोलीस ठाणे हददीत रोडरोमिओ यांच्या विरूध्द कारवाई करण्यात आली.

स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पुरुष व महिला सेवकांनी शाळा, महाविद्यालय तसेच गर्दीच्या ठिकाणी ही कारवाई करून टवाळखोरांना यांना चांगलाच दणका दिला. पोलिसांच्या या मोहिमेचे पालकांनी स्वागत केले आहे.

👉 हे ही वाचा:  राज्यातील 'या' जिल्ह्यांना आज (दि. १० जुलै) पावसाचा इशारा !

या विशेष मोहिमेत एकुण 71 जणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 112, 117 अन्वये कारवाई करण्यात आली.

तसेच नाशिक शहरातील शाळा, महाविदयालय परिसरातील शंभर मीटर अंतरावरील ज्या पानटप-यांवर प्रतिबंधीत असलेला गुटखा, सिगारेट, तंबाखु विक्री होतांना आढळुन आले, अशा पानटपरी चालकांवर व धुम्रपान करणा-या व्यक्ती विरूध्द कोप्ता कायदयाअंतर्गत एकुण 37 कारवाया करण्यात आल्या. अशा प्रकारे रोड रोमिओ व धुम्रपान करणा-या व्यक्ती विरूध्द एकुण 108 कारवाई करण्यात आली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790