news

नाशिक: कामगाराकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): कामगाराकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी (ता. २६) उघडकीस आली आहे. पीडिताच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडिताच्या वडिलांच्या दुकानात कामास असलेला दादा (पूर्ण नाव समजू शकले नाही) नामक संशयित नेहमी पीडितेच्या रुममधील बाथरूममध्ये अंघोळीस येत असत. तिच्यावर प्रेम असल्याचे त्यांने सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  युद्धामुळे घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमात महत्त्वाचा बदल… जाणून घ्या सविस्तर…

तिने त्यास नकार दिला. त्यानंतर जबरदस्तीने त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडिताच्या पोटात दुखू लागल्याने तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.

तपासणीत पीडिता गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. पीडिताच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790