नाशिक: तुझे आजारपण दूर करतो म्हणत महिलेला भुलवले, नंतर भोंदू बाबाने केला अमानुष प्रकार

नाशिक (प्रतिनिधी): निफाड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आजारी महिलेला जादूटोणा आणि उतारा करुन बरे करण्याचे आमिष दाखवून महिलेवर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथील एक महिला आजारी होती. आजारपण दूर करण्यासाठी ती एका भोंदूबाबाकडे गेली होती. तिथे उपचाराच्या बहाण्याने त्याने तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आजारपण दूर करतो सांगून केला अत्याचार:
आजारी महिलेला जादूटोणा आणि उतारा करून आजार बरे करून देण्याचं आश्वासन भोंदुबाबाने दिले. तिथे गेल्यावर त्याने एका महिलेवर जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. महिलेच्या तक्रारीनंतर ही संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल:
याबाबत, लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार लासलगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून पुढील तपास लासलगाव पोलिसांकडून केला जात आहे. तसंच संशयित आरोपी असलेल्या नराधमास अटकही करण्यात आली आहे.

पोट दुखतंय म्हणून पाच दिवसांच्या बाळाच्या पोटावर दिले चटके:
दरम्यान, यवतमाळमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पोट दुखीमुळं नवजात बाळ सतत रडत असल्याने पालकांनी मुलीच्या पोटावर चटके दिल्याची घटना घडली आहे. अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. मुलीच्या आई-वडिलांनी मुलगी सतत रडतेय म्हणून त्यांनी डॉक्टरांचा सल्ला न घेता गावातील लोकांनी सांगितलेल्या अघोरी प्रकाराचा प्रयोग केला आहे. पालकांनी पाच दिवसांच्या बाळाच्या पोटावर बिब्बा गरम करून त्याचे चटके दिले. मात्र या अमानवीय प्रयोगामुळे बाळाची प्रकृती अधिकच चिंताजनक झाली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790