Alert: मान्सूनपूर्वी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा धोका; मुंबईसह कोकण किनारपट्टीला अलर्ट

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ‘बिपरजॉय’ चक्रीवादळात तयार झालं आहे. चक्रीवादळाला पुढील 24 तासांत चक्रीवादळाच्या मार्गाची अंदाज येईल, असं हवामान विभागानं सांगितलं आहे.

मुंबई हवामान विभागाने या संदर्भात ट्विट केले आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर चक्रीवादळ तयार झालं आहे. हे चक्रीवादळ सरासरी समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटरपर्यंत पसरलं आहे. या चक्रीवादळामुळे पुढील 24 तासांत दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता आहे. असं ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे.

तर 8, 9, 10 June ला कर्नाटकात गोवा-महाराष्ट्राचा किनारपट्टीच्या भागात वादळी वार्‍याचा वेग 40-50 kmph, 60 kmph पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच, नैऋत्य अरबी समुद्र, कर्नाटक-गोवा-महाराष्ट्राचा किनारपट्टी समुद्र खवळलेला असण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांनी क्षेत्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

हे चक्रीवादळ खोल समुद्रात असल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर फार पावसाची शक्यता नाही, असं प्रादेशिक हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. चक्रीवादळ हे खोल समुद्रात आहे. या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती तयार झाली आहे. पुढील २४ तासांत उत्तरेच्या दिशेने ते पुढे सरकेल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. आज पहाटेच्या स्थितीचा अभ्यास करून हवामान विभागाने ही माहिती दिली आहे.

पुढच्या २४ तासांत ते उत्तर दिशेने सरकणार आहे. पूर्वमध्य अरबी समुद्रात आणि दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात सध्या ही स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईपासून ११२० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसळीकर यांनी ट्विट करून दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790