नाशिक: सिटी सेंटर सिग्नल चेंबरवर अखेर लोखंडी जाळीचा ढापा

शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा पाठपुरावा

नाशिक (प्रतिनिधी): सिटी सेंटर मॉल सिग्नलच्या चेंबरवरील सतत तुटणारा सिमेंटचा ढापा पुन्हा-पुन्हा बसविण्याचा हट्ट अखेर महापालिकेने सोडला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या सततच्या पाठपुराव्यानंतर बुधवारी, ७ जून रोजी येथे लोखंडी जाळीचा मजबूत ढापा टाकण्यात आला.

गोविंदनगरकडून सिटी सेंटर मॉलकडे जाताना सिग्नलवर पावसाळी गटारीचे चेंबर आहे. तेथील सिमेंटचा ढापा एका महिन्यात तीनवेळा तुटला, बदलण्यात आला. रविवारी, ४ जून रोजी तो पुन्हा तुटला. या रस्त्यावर रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. वारंवार ढापा तुटण्याच्या घटनेने अपघात होण्याची शक्यता होती.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या साल्हेरसह १२ किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळ यादीत !

येथील चेंबरची दुरुस्ती करून लोखंडी जाळीचा ढापा टाकावा, कायमस्वरुपी उपाययोजना करावी, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने करण्यात आली होती.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 16 जुलै रोजी आयोजन

सोमवारी, ५ जून रोजी महापालिका बांधकाम विभागाचे शहर अभियंता नितीन वंजारी यांना निवेदन देण्यात आले होते. बुधवारी चेंबरची दुरुस्ती करून लोखंडी जाळीचा ढापा टाकण्यात आला. याबद्दल बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, विठ्ठलराव देवरे, भालचंद्र रत्नपारखी, डॉ. शशीकांत मोरे, विनोद पोळ, नीलेश ठाकूर, बापूराव पाटील, पुरुषोत्तम शिरोडे, दिलीप निकम, अशोक पाटील, बाळासाहेब देशमुख, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब राऊतराय, मनोज वाणी आदींसह नागरिकांनी महापालिकेचे आभार मानले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790