आईचं काळीज ! पोटच्या मुलासाठी आई झाली जिवावर उदार…पाहा नाशिकमध्ये काय घडलंय

आईचं काळीज ! पोटच्या मुलासाठी आई झाली जिवावर उदार… पाहा नाशिकमध्ये काय घडलंय

नाशिक (प्रतिनिधी): आई आपल्या बाळाला भेटण्यासाठी काय करु शकते हे दाखवून देणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिक शहरातील पेठ रोड भागातील तृप्ती स्वप्नील जगदाळे-सोनार यांनी बाळाच्या काळजीपोटी चौथ्या मजल्यावरुन ग्रीलचा आणि पाइपचा आधार घेत तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवर उतरण्याचं धाडस केलं.

२८ वर्षीय तृप्ती या मूळच्या शिरपूरच्या असून सध्या त्या सुंदरम पॅलेस फ्लॅट नंबर १९, चौथा मजला, शरदचंद्र पवार मार्केट पाठीमागे अष्टविनायक नगर, पेठ रोड नाशिक येथे वास्तव्यास असतात.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

२२ मे रोजी तृप्तीताई आणि त्यांचं दीड महिन्यांचं बाळ हे दोघेच घरी होते. तृप्तीताईंचे पती स्वप्नील घरातील नातेवाईकाचा साखरपुडा असल्यानं तीन वर्षांची मुलगी मृण्मयीला घेऊन शिरपूरला गेले होते. घरात दोनजण असल्यानं मुख्य दरवाजा बंद करुन त्या घरात काम करत होत्या.

तृप्ती जगदाळे सोनार यांनी त्यांच्या बाळाला २२ मे रोजी झोळीत झोपवलं होतं. त्या घरातील कामं करत होत्या. घरात स्वच्छता केल्यानंतर त्या कचरा गॅलरीतील टाकण्यासाठी गेल्या आणि नेमक्या त्याचवेळी हवेच्या दाबामुळं गॅलरीचा दरवाजा बंद झाला आणि तृप्ती ताई गॅलरीत अडकून पडल्या. गॅलरीत अडकल्यानं बाळापर्यंत कसं पोहोचायचं असा प्रश्न त्यांच्या समोर होता.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

तृप्ती जगदाळे सोनार यांच्या पुढं घरात कसं पोहोचायचं असा प्रश्न होता. कारण, दीड महिन्याचं बाळ घरात झोळीत झोपवलेलं होतं. त्याच्यापर्यंत काहीही करुन पोहोचायचं, असा त्यांचा प्रयत्न होता. पती आणि मुलगी गावाकडे साखरपुडा करण्यासाठी गेलेले असल्यानं ते लवकर परत येणे अशक्य होतं. त्यामुळं तृप्ती यांनी गॅलरीला असलेल्या भिंतीचा आधार ग्रीलच्या सहाय्यानं घेत बाळापर्यंत पोहोचण्यासाठी जे करायला लागेल ते करायचं असं ठरवलं.

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

ग्रीलच्या बाजूनं असलेल्या पाइपचा आधार घेत तिसऱ्या मजल्याच्या त्या तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवर उतरल्या. तिथून पायऱ्यांवरुन चौथ्या मजल्यावर जात घराच्या मागच्या दारानं त्या खोलीत पोहोचल्या आणि बाळाला पोटाशी लावलं. त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा उघडला.

पती आणि मुलगी साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गावी गेलेले असल्यानं ते लवकर परतण्याची शक्यता कमी होती. कुणाला फोन करुन सांगावं तर मोबाइल फोन देखील घरात अडकलेला. त्यामुळं झोळीत झोपवलेल्या बाळापर्यंत काहीही करुन पोहोचायचं, असा निर्धार तृप्ती यांनी केला होता.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here