नाशिक: आधी चॅटिंग.. नंतर अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी.. दोन तरुणांवर गुन्हा दाखल

नाशिक: आधी चॅटिंग.. नंतर अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी.. दोन तरुणांवर गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): सोशल मीडियावरील मैत्रीतून अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देणा-या दोघा मित्राविरुध्द सरकारवाडा पोलिस ठाण्यात विनयभंगासह आयटी अ‍ॅक्ट आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मित्रांनी पैश्यांसह शरिर सुखाची मागणी करीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण करीत हरित कुंभसाठी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी जलज शर्मा

अथर्व शहाणे (२२ रा.औरंगाबाद) आणि सुहास जितेंद्र सराफ (२५ रा.सरस्वतीनगर,पंचक जेलरोड) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी अशोकस्तंभ भागात राहणा-या अल्पवयीन मुलीने तक्रार दाखल केली आहे. इस्टाग्राम आणि स्नॅपचॅट या सोशल साईटच्या माध्यमातून पीडितेशी संशयितांशी ओळख झाली होती.

👉 हे ही वाचा:  मोठी बातमी! PM धन धान्य कृषी योजनेला कॅबिनेटची मंजुरी; 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार लाभ

मैत्रीत रोजच चॅटींग होत असल्याने संशयितांनी मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा उचलत तिला न्यूड फोटो टाकण्यास भाग पाडले. त्यानंतर गेल्या आठवड्यात संशयितानी अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीकडे शरीरसुखाची आणि पैश्यांची मागणी केल्याने पीडितेने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रविण चव्हाण करीत आहेत.

👉 हे ही वाचा:  राज्यातील मुसळधार पावसाने घेतली विश्रांती; 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790