NC

नाशिक: तीन वाहनांचा भीषण अपघात; अपघातात एकाचा जागीच मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. तीन वाहनांची एकमेकांना जोरात धडक बसल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये बस, पिकअप आणि ट्रॅक्टर अशी तीन वाहने एकमेकांवर आदळली. त्यामुळे या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ : ऐतिहासिक ओळख जपून नाशिक-त्र्यंबकेश्वर शहर सुशोभीकरणासाठी आढावा बैठक

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सटाणा-देवळा महामार्गावर रात्रीच्या सुमारास सावकी फाटा याठिकाणी बस, ट्रॅक्टर व पीकअप यांचा तिहेरी अपघात होऊन यात ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर बस मधील प्रवाशांसह ट्रॅक्टरवरील १० पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले आहेत.

नाशिकहून नंदुरबारकडे भरधाव जाणा-या बसची ट्रॅक्टरला धडक बसल्याने ट्रॅक्टर पुढे जाणा-या पिकअपवर जाऊन धडकला. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ : ऐतिहासिक ओळख जपून नाशिक-त्र्यंबकेश्वर शहर सुशोभीकरणासाठी आढावा बैठक

गेल्या काही दिवसात अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अपघातात जखमी झालेल्यांवर रुग्णालायत उपचार सुरू आहेत.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790