नाशिक: रविवार कारंजावरील चांदीच्या गणपती मंदिरात दागिन्यांची चोरी, काही तासांत आरोपी ताब्यात

नाशिक (प्रतिनिधी): येथील रविवार कारंजावरील चांदीच्या सिद्धिविनायक गणपती मंदिरात आज पहाटे एका इसमाने गणपतीचे दागिने चोरल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीस काही तासांतच पोलिसांनी बेड्या ठोकल्या. निहाल यादव असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास रविवार कारंजावरील चांदीच्या गणपती मंदिराच्या बाहेर एक इसम हातात लोखंडी रॉड घेऊन आला. त्याने सुरुवातीला बंद दरवाजाची काच त्या रॉडने फोडली. काच फुटल्याचा आवाज आल्याने तेथील सुरक्षारक्षकाने त्याला हटकले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मोटारसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

सिडकोत सराईत गुन्हेगार राकेश कोष्टीवर गोळीबार; एक संशयित पोलिसांच्या ताब्यात

त्यावेळी त्या इसमाने त्यालाही डोक्यात रॉडने मारून जखमी केले. सुरक्षारक्षक खाली पडल्यानंतर चोरट्याने गणपतीच्या गळ्यातील सोन्याचा मुलामा असलेले तीनशे ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरून नेले. दरम्यान, ही गोष्ट पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्याचा पाठलाग केला.

नाशिक: तापमानाचा पारा चाळिशी पार; पहिल्यांदा सर्वाधिक तापमानाची नोंद

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच चोरट्याने गंगेत उडी घेत नदी पार केली. दरम्यान, पोलिसांनी इतर पोलिसांना घटनेची माहिती दिल्याने दुसर्‍या बाजूनेही पोलीस चोरट्याला पकडण्यासाठी आल्याने त्याला पकडण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेले दागिने जप्त केले असून, जखमी सुरक्षारक्षकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पी. एस. आय. प्रकाश मेमाणे करीत आहेत.

नाशिक: वयोवृद्ध पित्याला मुलाकडून मारहाण, जेवायलाही दिले नाही; पित्याची पोलिसात धाव

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

असा रचला चोरीचा कट:
निहाल यादव हा पंचवटीतील एका अमृततुल्यावर कामास आहे. त्याने एक आठवड्यापूर्वी चांदीच्या गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनास जात रेकी केली होती. गणपतीच्या गळ्यात असलेल्या चांदीच्या दागिन्यांना सोन्याची पॉलिश असल्याने ते दागिने सोन्याचे असल्याचे त्याला वाटले होते. त्या दिवशीच त्याने ही चोरी करण्याचा कट रचला होता. आणि त्यानुसार आज पहाटे त्याने ही चोरी करण्याचा प्रयत्न केला.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here