🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: मिरची हॉटेल चौकात भरधाव मालट्रकने दिलेल्या धडकेत ४५ वर्षीय दुचाकीस्वार ठार

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: मिरची हॉटेल चौकात भरधाव मालट्रकने दिलेल्या धडकेत ४५ वर्षीय दुचाकीस्वार ठार

नाशिक (प्रतिनिधी): औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल सिग्नल जवळ भरधाव मालट्रकने दिलेल्या धडकेत ४५ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी ध्वजस्तंभ व पताका रचना आढावा बैठक

नाशिक: केटीएचएमला शिकणाऱ्या १७ वर्षीय तरुणाचा नदीत पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमित विलास पोहरकर (४५ रा.शिवकृपानगर हिरावाडी) हे गुरूवारी (दि.३०) जेजूरकर मळयाकडून संभाजीनगर नाक्याच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना मिर्ची हॉटेल सिग्नल परिसरात औरंगाबादकडून भरधाव येणा-या एमएच १५ एचयू ८४४६ या मालट्रकने दुचाकीस जोरदार धडक दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गरवारे ते एक्स्लो पॉइंट वाहतूक मार्गात बदल !

या अपघातात दुचाकीस्वार पोहरकर याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शमुवेल हिवाळे (रा.मनमाड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790