नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिक: गाडीचा टायर फुटल्याने अपघात; सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी ठार
नाशिक (प्रतिनिधी): सिन्नर तालुक्यातील रामनगर पाटोळे येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रामनाथ जबाजी कराड (वय 68) यांच्या वाहनाला मंगळवारी (ता. 28) सायंकाळी नाशिक पुणे महामार्गावर अपघात झाला.
माळवाडी शिवारात कार पलटी होऊन झालेल्या या अपघातात त्यांचे निधन झाले.
नाशिक: दुर्दैवी घटना… धावत्या दुचाकीवर हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू
अपघात घडल्यानंतर श्री. कराड यांना तातडीने सिन्नर व तेथून नाशिक येथे खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांचे डोक्याला गंभीर जखम झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शेतकरी कुटुंबातील असलेले श्री कराड यांनी ठाणे जिल्ह्यात शहापूर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली.
नाशिक: काठे गल्लीत युवकावर प्राणघातक हल्ला; अल्पवयीन संशयित मुले ताब्यात
कुलाबा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक धात्रक यांचे ते मेहुणे होत. काही कामानिमित्त ते कार मधून नाशिक पुणे महामार्गावरून प्रवास करत असताना माळवाडी शिवारात कार पलटी होऊन अपघात झाला. टायर फुटल्यामुळे कारणे पलट्या खाल्ल्या व रस्त्याच्या कडेला जाऊन पडली असे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडे याबाबत कुठलीही अधिकृतपणे माहिती उपलब्ध नव्हती.