नाशिक: पंचवटीतील गोळीबार प्रकरणातील संशयितांची परिसरातून धिंड

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: पंचवटीतील गोळीबार प्रकरणातील संशयितांची परिसरातून धिंड

नाशिक (प्रतिनिधी): फुलेनगर परिसरातील गोळीबार प्रकरणातील संशयितांची मंगळवारी (ता.२१) पोलिसांनी फुलेनगर परिसरातून धिंड काढली. परिसरातील नागरिकांच्या मनातील दहशत कमी व्हावी या उद्देशाने पोलिसांनी तिघा संशयितांची घटना घटनास्थळाहून धिंड काढली.

🔎 हे वाचलं का?:  संगमनेर तालुक्यात सहावीतील विद्यार्थिनीवर अ‍ॅसिड हल्ला; चेहऱ्याला दुखापत, परिसरात खळबळ

फुलेनगर भागातील मुंजोबा चौक येथे प्रेम महाले हा आपल्या मित्रासोबत उभा होता, याच वेळी त्या ठिकाणी संशयित विशाल भालेराव, विकी वाघ, संदीप आहिरे, जय खरात यांनी त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला.

हा हल्ला चुकून प्रेम महाले याने घराकडे धाव घेतली. संशयितांनी त्याचा पाठलाग करून महाले याच्या घराच्या दिशेने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भरदिवसा घरफोडीत ६.७४ लाखांचा ऐवज लांबवला

अंगाला गोळी चाटून गेल्याने यात महाले याची आई जखमी झाली होती. त्यांनतर पोलिसांनी तपासाला गती देत घटनेतील संशयित विशाल ऊर्फ विकी विनोद वाघ, जय संतोष खरात, संदीप आहिरे या तिघांना ताब्यात घेतले आहे. तर विकी वाघ याच्याकडून एक गावठी पिस्तूलदेखील मिळून आली होते.

पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याचे संशयितांनी सांगितले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांनतर पोलिसांनी या तिघांची परिसरातून धिंड काढली होती. या वेळी सहायक पोलिस आयुक्त गंगाधर सोनवणे, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, निरीक्षक रणजित नलावडे, पंचवटी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार, सहाय्यक निरीक्षक विलास पडोळकर, गुन्हे शोध कर्मचारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790