Live Updates: Operation Sindoor

पंचवटी: वेल्डिंगचे काम करतांना लागलेल्या आगीत ट्रक जळून खाक; वेल्डिंग करणारा गंभीर जखमी

पंचवटी: वेल्डिंगचे काम करतांना लागलेल्या आगीत ट्रक जळून खाक; वेल्डिंग करणारा गंभीर जखमी

नाशिक (प्रतिनिधी): पंचवटीतील आडगाव येथे ट्रकला वेल्डिंगचे काम करतांना अचानक ट्रकला आग लागल्यामुळे ट्रक जळून खाक झाला तर वेल्डिंग करणारा गंभीररित्या भाजल्याने जखमी झाल्याची घटना घडली आहे.

👉 हे ही वाचा:  यंदा मान्सूनचे लवकर आगमन – १३ मेपूर्वी अंदमानात प्रवेश, महाराष्ट्रातही लवकर हजेरीची शक्यता

अचानक लागलेल्या या आगीमुळे मोठा भडका उडाल्यामुळे आजूबाजूला असणारे नागरिक भयभीत झाले होते.

या आगीने रौद्ररूप धारण केले होते. पण, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवली.

👉 हे ही वाचा:  नाशिक परिमंडळात सेवा पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यात १ हजार ४०२ नवीन वीजजोडण्या

या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली. वेल्डिंग करण्यापूर्वी ट्रकच्या बॅटरीची वायर काढण्याचा वेल्डिंग काम करणाऱ्याला विसर पडल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. या घटनेत वेल्डिंग करणा-याचे हात पाय भाजले असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिकच्या या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारला म्हणून कोयत्यानं हल्ला
नाशिक: प्रेयसीसोबत असलेल्या नात्यात आईचा अडथळा ठरवत मुलाने उचललं हे टोकाचं पाऊल !

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790