नाशिक विमानसेवेला बूस्ट; 15 मार्चपासून नागपूर, अहमदाबाद, गोवा एअर सर्विस
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या विमानसेवेला पुन्हा बूस्ट मिळणार असून आता विमानसेवेतील महत्वाची कंपनी असलेल्या इंडिगोने याकरता गुरुवारी (2 फेब्रुवारी) रात्रीपासून तिकीट बुकिंग सुरु केले आहे. किफायतशीर तिकीट दर
नाशिक विमानसेवा मागील काही महिन्यांपासून अस्थिर असल्याचे चित्र आहे.
अनेक कंपन्यांनी काढता पाय घेतल्यानंतर पुन्हा एकदा पाठपुरावा करुन विमान कंपन्यांना सेवा सुरु ठेवण्यासाठी साकडे घातले जात आहे.
याच अनुषंगाने आज शुक्रवारी (3 फेब्रुवारी) नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, अंबड इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि ट्रॅव्हल एजंट असोसिएशन यांची संयुक्त बैठक इंडिगोच्या अधिकाऱ्यांसोबत होणार आहे. विशेष म्हणजे कंपनीने तिकिटांचे दर अत्यंत किफायतशीर ठेवले असल्याचे सांगण्यात येत आहे.
- आईच्या उपचारासाठी नाशिकमध्ये आलेल्या चिमुकलीवर काळाचा घाला; पित्याच्या डोळ्यांदेखत मृत्यू
- नाशिक: गोल्फ क्लब मैदानावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा विनयभंग
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तिकीट बुकिंग सुरु होऊ शकते हे देखील यात स्पष्ट करण्यात आले होते. गुरुवारी प्रत्यक्ष तिकीट बुकिंग करण्यात सुरु झाले आहे. सुरुवातीला इंडिगोच्या अधिकृत वेबसाईट आणि एजंट यांच्या संकेतस्थळावर ते बुकिंग सुरु झाले असून आजच्या बैठकीनंतर स्थानिक ट्रॅव्हल एजंटकडे देखील ते उपलब्ध होऊ शकणार आहे.