नाशिक हादरलं: कर्जाला कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

नाशिक हादरलं: कर्जाला कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या सातपूर परिसरातील राधाकृष्णनगर येथे व्यावसायिक कुटुंबातील तिन्ही पुरुषांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. वडिलांसह दोन्ही तरुण मुलांनी घरातील तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गळफास घेऊन जीवन संपविले. त्यांच्या या दुर्दैवी निर्णयामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक शिरोडे (वडील, वय ५५), प्रसाद शिरोडे (मोठा मुलगा, वय २५), राकेश शिरोडे (वय २३) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

या तिघांनी एकाच घरात तीन वेगवेगवेगळ्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिरोडे कुटुंबिय हे अशोकनगर शेवटचा बसस्टॉप परिसरात फळांचा व्यवसाय करीत होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी !

शिरोडे कुटुंबीय हे मूळचे देवळा तालुक्यातील उमराणे येथील रहिवासी आहेत. गेल्या १० वर्षांपूर्वी ते नाशिकमध्ये व्यवसायानिमित्त आले. राधाकृष्ण नगर परिसरात त्यांचे घर आहे. वडिल दीपक हे अशोक नगर शेवटचा बसस्टॉप येथील भाजी बाजाराजवळ फळ विक्री करत होते. तर त्यांची मुले प्रसाद आणि राकेश हे चारचाकी वाहनांवर फळविक्रीचा व्यवसाय शिवाजी नगर परिसरात करायचे.

आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने शिरोडे कुटुंबिय कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे ते नैराश्यात होते. आज (दि. २९ जानेवारी) दुपारच्या सुमारास दीपक शिरोडे यांच्या पत्नी काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. यावेळी वडिलांसह दोन्ही मुलांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घरातील तिन्ही खोलींमध्ये असलेल्या पंख्याला गळफास घेत आपले जीवन संपविले. थोड्या वेळाने आई घरी येताच तिने दरवाजा ठोठावला. पण, आतून कुणीही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्या घाबरल्या. परिसरातील नागरिकांना त्यांनी आवाहन केले. त्यानंतर दरवाजाची कडी तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

अखेर दरवाजा तोडून आत प्रवेश करताच या मातेला आपल्या पतीसह दोनही तरुण मुलांनी गळफास घेतल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे या मातेने जोरदार हंबरडा फोडला.

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

आजच कन्येचा जन्म अन पित्याची आत्महत्या:
प्रसाद शिरोडे यांच्या पत्नी या गर्भवती असल्याने मुंबईत माहेरी गेल्या होत्या. आज सकाळीच त्यांची प्रसुती झाली. आणि त्यांनी कन्येला जन्म दिला. शिरोडे कुटुंबात लक्ष्मीने आगमन केल्याची वार्ता सगळीकडे पसरली. मात्र, अशा आनंदाच्या प्रसंगीच या तिघांनी अतिशय हृदयद्रावक निर्णय घेतला. कन्येचा जन्म झालेला असताना पित्यासह आजोबा आणि काका यांनी आत्महत्या केल्याने सातपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here