नाशिक: ‘त्याने’ आधी लिफ्ट मागितली, पण लिफ्ट देणाऱ्या अल्पवयीन मुलांनीच त्याचा खून केला…

नाशिक: ‘त्याने’ आधी लिफ्ट मागितली, पण लिफ्ट देणाऱ्या अल्पवयीन मुलांनीच त्याचा खून केला…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या पंचवटी परिसरात आढळलेल्या मृत तरुणाची ओळख पटविण्यासह खूनाचा उलगडा करण्यात पंचवटी पोलिसांना यश आले. दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याने दुचाकीवर लिफ्ट दिलेल्या तरुणांनीच ऋषीकेशला संपवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरातील मखमलाबाद परिसरातील लिंकरोडवरील समर्थ नगर परिसरात मोकळ्या जागेत युवकाचा मृतदेह आढळून आला होता. सुरवातीला मृत युवकाची ओळख पटविणे देखील मुश्किल झाले होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

अशातच पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर या खुनाचाउलगडा झाला आहे.

मृत तरुणाने आदल्या रात्री रस्त्याने जाणाऱ्या युवकांकडे लिफ्ट मागून पुन्हा दोघांशी वाद घातला. त्यातून दुचाकीवरील दोन अल्पवयीन मुलांनी तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

ऋषिकेश उर्फ कुशल दिनकर भालेराव असे मृत तरुणाचे नाव आहे.

शरदचंद्र पवार मार्केट ते मखमलाबाद रोड लिंकरोडवरील पाटालगत, हमालवाडी, पंचवटी येथे शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एक अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गंभीर गुन्हयातील अनोळखी तरुणाची ओळख पटविण्यास व त्यास  ठार मारणाऱ्या अज्ञात आरोपींचा तात्काळ शोध घेण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलिसांना दिल्या.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. पथकांमार्फत नाशिक शहरातील पंचवटी, सातपूर, गंगापूर, हिरावाडी, म्हसरूळ, गंगाघाट, सरकारवाडा परीसर पिंजून काढण्यात आला. पोलिसांना मृताची ओळख पटवण्यात यश आले. मृत तरुण ऋषिकेश उर्फ कुशल दिनकर भालेराव असल्याचे निष्पन्न केले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

गुन्हयातील मयताची ओळख पटल्यानंतरही मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे होते. गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांनी पथकातील अंमलदारांसह दोन दिवस गुन्ह्याचा तपास केला. दरम्यान पोलिसांना तपासात दोन विधीसंघर्षित बालकांनी ऋषिकेशचा खून केल्याचे निष्पन्न केले. पोलिसांना दोघांना तपासकामी ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत दोघांनी ऋषिकेशचा खून केल्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक युवराज पत्की करीत आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here