नाशिकमध्ये कॅनडा कॉर्नरला विद्यार्थ्यांच्या रूममध्ये सिलेंडरचा भडका, स्फोटात स्लॅबही कोसळला!
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक येथील कॅनडा कॉर्नरजवळ असलेल्या अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास आगीचा भडका उडाला.
क्षणार्धात संपूर्ण फ्लॅट आगेच्या भक्षस्थानी सापडला.
सुदैवाने रूममधील विद्यार्थी जागी असल्याने तत्काळ ते घराबाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी सिलेंडरचा स्फोट होऊन स्लॅब कोसळल्याने फायरमन विजय नागपूरे हे जखमी झाले.
नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नरजवळील बिजनेस स्क्वेअर जवळील मिताश्री अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर सदनिकेत आगीची घटना घडी.
शरणपूर परिसरातील तिबेटियन मार्केट जवळील अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर फ्लॅटमधून अचानकपणे धुराचे लोट व आगीच्या ज्वाला भडकतांना नागरिकांना दिसून आल्या.
त्यांनी तात्काळ अपार्टमेंट मध्ये रहिवाशांना आगीची माहिती दिली. त्याचबरोबर आग लागलेल्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास असलेले महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तात्काळ जिन्यावरून खाली पळ काढला. यातील स्वप्निल लहामगे यांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या दिल्यानंतर शिंगाडा तलाव येथील मुख्यालयास दिली. माहिती मिळताच फायरमन पथकासह घटनास्थळी धाव घेतली. आगीचे स्वरूप बघून तातडीने अतिरिक्त मदत मागविण्यात आली. मुख्यालय, सिडको, पंचवटी, कोणार्क नगर येथून प्रत्येकी एक असे पाच बंब घटनास्थळी पोहोचले.
दरम्यान दोन बंबांचा वापर करून अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुमारे दोन तास शर्तीचे प्रयत्न करत आग विझवण्यात आली. दरम्यान घरमालक निलेश आंबेकर यांच्या तेरावे क्रमांकाच्या सदनिकेत आठ ते दहा विद्यार्थी वास्तव्यास असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान जवानांनी स्वयंपाक गृहातून दोन सिलेंडर बाहेर काढले. ते अर्धवट भरलेले होते. घरात साचलेला धूर अंधारामुळे एक सिलेंडर दिसून आला नाही. तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा सिलेंडर घरात आहे. पण रिकामी असल्याचे सांगितले.
यामुळे जवानांनी पाण्याचा मारा करत आग विझवण्यावर लक्ष केंद्रित केले. यावेळी अचानकपणे एक सिलेंडर तापल्याने फुटला. यावेळेस स्लॅबचा काही भाग कोसळून आगमिषांना दलाचे कर्मचारी नागपूरे हे जखमी झाले. सुदैवाने त्यांच्या डोक्यावर हेल्मेट परिधान केलेले असल्यामुळे ते मध्यम स्वरूपात जखमी झाले. सद्यस्थितीत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- अभिमानास्पद: महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात नाशिकच्या प्रचिती भवरची निवड
- नाशिक: पुन्हा जुळत आलेला संसार झाला उदध्वस्त: आधी सोशल मीडियाद्वारे प्रेम; मग महिलेस ब्लॅकमेल
- तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा अगदी मोफत.. इथे क्लिक करा…
मुख्य दरवाजा उघडताच आगीचे लोट बाहेर पडण्यास सुरवात झाली. यावेळी अग्निशमन दलाने माईकवरून सूचना देत संपूर्ण अपार्टमेंट रिकामी करण्यास सांगितले. यामुळे तातडीने सर्व रहिवासी सुरक्षितपणे आपापल्या घरांमधून बाहेर पडले. जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत भीषण आग शमवण्यासाठी पाण्याचा मारा सुरू केला. सुमारे दोन तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र या आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याचे समजते आहे.