अभिमानास्पद: महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात नाशिकच्या प्रचिती भवरची निवड

अभिमानास्पद: महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात नाशिकच्या प्रचिती भवरची निवड

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या प्रचिती भवरची पंधरा वर्षांखालील महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे रांची येथे खेळविल्‍या जाणाऱ्या ५० षटकांच्‍या एकदिवसीय सामन्यांच्‍या स्‍पर्धेत ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्‍व करणार आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: घरफोडीच्या गुन्हयातील सराईत आरोपीस मुद्देमालासह घेतले ताब्यात

उजव्या हाताने फलंदाजी करणारी प्रचिती अष्टपैलू खेळाडू असून ऑफ स्पिन गोलंदाजी करते. प्रचितीच्या निवडीमुळे सध्या महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या पुरुष व महिलांच्या सर्वच वयोगटात नाशिकच्या क्रिकेटपटू राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत प्रतिनिधित्व करत आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रकाश लोंढे टोळीवर अखेर मकोकाची कारवाई

या स्‍पर्धेतील साखळी सामने उद्या (ता.२६) पासून ३ जानेवारीदरम्यान रांची येथे खेळविले जाणार आहेत. महाराष्ट्र संघाची लढत उद्या (ता.२६) मुंबई संघासोबत होईल. बुधवारी (ता.२८) वडोदरा, ३० डिसेंबरला हरियाणा, १ जानेवारीला पुदुचेरी, आणि ३ जानेवारीला छत्तीसगड संघासोबत लढत होणार आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790