नाशिक: पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे पतीने नदीत उडी घेत केली आत्महत्या
नाशिक (प्रतिनिधी): पत्नीच्या अनैतिक संबधामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या पतीने जीवनाला कंटाळून गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती.
या आत्महत्येस पत्नी आणि तिचा प्रियकर जबाबदार असल्याचा आरोप करत दोघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
अंबड पोलिसांनी तक्रारीची दखल घेत संशयित पत्नी आणि तीच्या प्रियकराच्या विरोधात आत्महत्येस प्रावृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि टिकमदास बैरागी रा. कामटवाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगा राकेश बैरागी वय 35 याची पत्नी पुजा हिचे संशयित रिझवान नासिर मन्सुरी रा. बजरंगवाडी पुणा रोड याच्या सोबत प्रेमसंबध असल्याची माहिती राकेशला मिळाली होती.
पत्नीने व्याभिचारपणा सोडून चांगले वागावे असे राकेश नेहमी समजावून सांगत होता. तरी देखील पत्नी पत्नी घरी नसतांना प्रियकरासोबत बोलत असल्याने पती मानसिक त्रास असल्याने दि. 20 पासून घरातून बेपत्ता झाला होता. वडिलांनी अंबड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. गुरुवार दि.22 रोजी असामाराम बापु पुला जवळ एक मृतदेह तरंगतांना आढळून आला होता.
गंगापूर पोलिसांनी बेपत्ता इसमाची ओळख पटवली असता तो मृतदेह राकेश बैरागीचा असल्याची ओळख त्याच्या वडीलांनी पटवली होती. अंबड पोलिसांत मुलाचाच घातपात असल्याची तक्रार दिली होती. पोलिसांची चौकशी केली असता पत्नीच्या अनैतिक संबधाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला होता. राकेश चे वडील टिकमदास यांनी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीच्या अधारे मानसिक तनावातून राकेशने आत्महत्याच केल्याचा आरोप केला. वरिष्ठ निरिक्षक भगीरथ देशमुख यांनी संशयित पत्नी आणी तीच्या कथित प्रियकराच्या विरोधात आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. सहायक निरिक्षक वसंत खतेले पुढील तपास करत आहे.
पाण्यात आढळला होता मृतदेह:
राकेश हा घरातून बेपत्ता झाला होता. अंबड पोलिसांत मिसिंग ची तक्रार दिली होती. पोलिसांकडून शोध सुरु असतांना आसाराम बापु पुलाच्या जवळ पाण्यात तरंगतांना मृतदेह आढळून आला होता. मिसिंग व्यक्तीचे वर्णन मिळत असल्याने हा मृतदेह राकेशच्या असल्याची ओळख वडीलांनी पटवली होती.