Breaking: मामाच्या मुलाचा खून करून फरार असलेला आरोपी नाशिकरोड पोलिसांच्या जाळ्यात
नाशिकरोड (प्रतिनिधी):-अमरावती शहरात मामाच्या मुलाचा खून करून चार महिन्यापासून फरार असलेल्या मुख्य संशयीता नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने शिताफीने ताब्यात घेतले.
नवनिर्वाचित शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी छोटे मोठे गुंड सराई व टवाळकरांवर कारवाई करून त्यांची माहिती संकलित करणे बाबत सर्व पोलीस स्टेशनला आदेशित केले होते.
त्या अनुषंगाने पोलीस पथक काम करीत असताना पोलीस उपायुक्त कार्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक विशाल पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अमरावती शहरातून खुन करून फरार झालेला आरोपी नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत आहे.
चार महिन्यापासून अमरावती पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे समजतात पाटील यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे यांना माहिती देत नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल बाळकृष्ण शिंदे, पोलीस हवालदार वसंतराव काकड, मनोहर शिंदे, अविनाश देवरे, सोमनाथ जाधव, राकेश बोडके, केतन कोकाटे यांनी सुरज सुभाष मारवे (वय 29) सुदर्शन नगर, खंडेलवाल बिल्डिंग जवळ फैजलपुर अमरावती यास शिताफीने ताब्यात घेतले.
सुरज व त्याच्या चार साथीदारांनी त्याच्या सख्या मामाच्या मुलाचा तीक्ष्ण हत्याराने महिन्यापूर्वी खून केला होता. यातील चार संशयित अमरावती पोलिसांच्या ताब्यात असून सूरज हा गेल्या चार महिन्यापासून सदरच्या गुन्ह्यातील प्रमुख संशयित म्हणून फरार होता. अमरावती पोलीस यांना याबाबत माहिती कळवली असून त्यांचे पथक नाशिककडे रवाना झाले आहे.