Amazon

नाशिक: अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पालखी यात्रेतील दोघा साई भक्तांचा मृत्यू

नाशिक: अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पालखी यात्रेतील दोघा साई भक्तांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): मुसळगाव एमआयडीसी मधील शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत मुंबई येथील दोन साई भक्तांचा मृत्यू झाल्याची अतिशय हृदय द्रावक घटना मंगळवारी ( दि 20)सकाळी पहाटेच्या सुमारास घडली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: श्री साक्षी गणेश मंदिरात आज सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

घटनेचे सविस्तर वृत्त असे की मुंबई येथून साई संस्कृती फाऊंडेशन व राज प्रतिष्ठानच्यावतीने काढण्यात आलेल्या पायी पालखी यात्रेत शिर्डी येथे निघाले होते.

आज (दि.20) पहाटे पालखी मुसळगाव शिवारात आली असता बी. एस. एल. कंपनीसमोर पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने संजय शंभू जाधव (23) व महेश शंकर सिंग (23) रा. मीरा रोड, मुंबई यांना अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक देऊन पसार झाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनालाही प्राधान्य द्यावे- पालकमंत्री गिरीश महाजन

धडकेत दोघे गंभीर जखमी झाले. सोबतच्या मित्रांनी रुग्णवाहिकेच्या साहाय्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच दोघांचा मृत्यू झाला. सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक त्रिभुवन करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790