हृदयद्रावक: पतंगाच्या मोहापायी 13 वर्षीय मुलाने गमावला जीव; 3 दिवसानंतर नदीपात्रात आढळला मृतदेह
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या येवला तालुक्यातील मुखेड येथे शनिवार (ता.१७) रोजी मुखेड येथील १३ वर्षीय मुलाचा गोई नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या मृत मुलाचा मृतदेह तीन दिवसानंतर नदीपात्रात तरंगताना आढळून आला.
मुलाचा मृत्यू पतंगाच्या मोहापायी झाल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
रोहित माळी (वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे.
- नाशिक: बालपणीच्या मैत्रीणीकडेच शरिरसुखाची मागणी करुन धमकी देणारे दोघे मित्र गजाआड
- नाशिक: जावयाच्या मोटारसायकलवर बसतांना तोल जाऊन पडल्याने सासूचा मृत्यू
- नाशिक- पुणे रोडवर ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार ठार; बिटको चौकीसमोर घडली घटना
तालुक्यात मकरसंक्रांत सणाचे विशेष महत्त्व असून येवला शहर व तालुक्यात संक्रांतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पतंगोत्सव साजरा केला जातो. गोई नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना येवला तालुक्यातील मुखेड येथे शनिवारी घडली. येथील रोहित हा मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा सर्वत्र शोध सुरू असताना शनिवारी रोहितचा मृतदेह मुखेड येथीलच गोई नदीपात्रात तरंगताना आढळून आला. शेजारीच असलेल्या पतंग व काठीवरून रोहितचा मृत्यू पतंगाच्या मोहासाठी झाला असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.