नाशिक: पती-पत्नीच्या वादात दीड वर्षीय निष्पाप बालकाचा दुर्दैवी मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): पती पत्नीच्या वादात दीड वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली आहे…
कौटुंबिक मतभेदामुळे लहान बालकाचा मॅजिक बॉल गिळल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उपनगर येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शीतल संकेत बोराडे (वय 27, रा. जाधव संकुल, सातपूर, नाशिक) व आरोपी संकेत प्रवीण बोराडे (वय 31, रा. सुगंध बंगला, जेलरोड, नाशिकरोड) हे दोघे पती-पत्नी आहेत.
त्यांच्यात कौटुंबिक मतभेद आहेत. दि. 2 ते 12 मेदरम्यान संशयित आरोपी संकेत बोराडे याने त्याला वैद्यकीय क्षेत्राची माहिती असताना, तसेच बिटको हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचे काम केलेले आहे.
बोराडे यांनी आपला मुलगा शिवांश याच्यासाठी घरी छोटा मॅजिक क्रेझी बॉल आणला होता. दरम्यान, फिर्यादी शीतल बोराडे या भाजी आणायला जात असताना त्यांनी पती संकेत बोराडे यास शिवांशकडे लक्ष देण्यास सांगितले; मात्र संकेत याने निष्काळजीपणा केला असा आरोप आहे. त्यानंतर फिर्यादी महिला ही भाजीपाला घेऊन घरी आली. त्यावेळी तिला शिवांश हा बालक गादीवर पालथा पडलेला दिसला. याबाबत आरोपी संकेत बोराडे याला विचारले असता त्याने टाळाटाळ केली.
- आधारतीर्थ आश्रमातील खुनाची अखेर उकल; मोठ्या भावाच्या शिवीगाळीचा लहानगा बळी
- सेलोटेपने हातपाय बांधून कुटुंबियांना जबर मारहाण , नाशिक जिल्ह्यात पुन्हा सशस्त्र दरोडा
त्यानंतर शिवांशला सरळ करून पाहिले असता त्याने बॉल गिळल्याचे समजले. हा बॉल गिळल्यानंतर कसा काढायचा, याची माहिती आरोपी बोराडे याला असतानासुद्धा त्याने बाहेर न काढता चालढकलपणा केला, तसेच या बालकाला उपचारासाठी बिल्डिंगजवळील एका हॉस्पिटलमध्ये न नेता इतर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याच्या बहाण्याने वेळ वाया घालविला. अशातच आरोपीने हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्यानेच शिवांश या बालकाचा मृत्यू झाला, अशी फिर्याद उपनगर पोलीस ठाण्यात शीतल बोराडे यांनी दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी संकेत बोराडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोळे करीत आहेत.