आधारतीर्थ आश्रमातील खुनाची अखेर उकल; मोठ्या भावाच्या शिवीगाळीचा लहानगा बळी

NPA GOLD LOAN

आधारतीर्थ आश्रमातील खुनाची अखेर उकल; मोठ्या भावाच्या शिवीगाळीचा लहानगा बळी

नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकेश्वर रोडवरील आधारतीर्थ आश्रमात मंगळवारी चिमुकल्याचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती.

मात्र या खुनामागील गूढ कायम होते. आता अखेर या खुनाची उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

आश्रमात मुले खेळत असताना त्यातून वाद झाला आणि शिंगारे बंधूंनी संशयित अल्पवयीन मुलास शिवीगाळ केली. या किरकोळ कारणावरून साडेतेरावर्षीय संशयित मुलाने साडेतीनवर्षीय आलोकचा गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे.

मंगळवारी (ता. २२) सकाळी आलोक आश्रमातील त्याच्या खोलीच्या बाहेर मृतावस्थेत आढळून आला होता. अखेर तीन दिवसांनी या खुनाच्या घटनेची उकल करण्यात पोलिसांना यश आले.

नाशिक-त्र्यंबकेश्‍वर रोडवरील आधारतीर्थ आश्रमात मंगळवारी सकाळी साडेसहा-सातच्या सुमारास साडेतीनवर्षीय आलोक विशाल शिंगारे संशयास्पदरीत्या मृतावस्थेत आढळून आला होता. शवविच्छेदनातून आलोक याचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी त्र्यंबकेश्‍वर पोलिसांत अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर अधीक्षक माधुरी कांगणे, त्र्यंबकेश्‍वरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आश्रमातील लहान मुलांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण होते.

परंतु, खुनाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी अत्यंत संयम आणि संवेदनशील पद्धतीने तपास करावा लागला. यासाठी त्याचे कौशल्यपणाला लागले. मुलांमध्ये चुकीचा मेसेज जाऊन नये याची पोलिस यंत्रणेने दक्षता घेत बालकल्याण समितीसमोर संशयितास आणले. या वेळी संशयिताने घटनेची माहिती दिली. आलोक आणि त्याचा मोठा भाऊ आयुष हे दोघे आश्रमात राहतात.

घटनेपूर्वी संशयित साडेतेरावर्षीय अल्पवयीन मुलाशी शिंगारे बंधूंचा वाद झाला. त्यातून शिंगारे बंधूंनी त्यास शिवीगाळ केली. त्याचा राग डोक्यात धरून संशयित अल्पवयीन मुलाने सोमवारी (ता. २१) मध्यरात्री झोपेत असलेल्या आलोक यास खोलीबाहेर नेले आणि साडीच्या सहाय्याने त्याचा गळा आवळून खून केला. या प्रकरणी त्र्यंबक पोलिसांनी अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates