Breaking: म्हसरूळला 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वसतिगृह चालकास बेड्या

Breaking: म्हसरूळला 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वसतिगृह चालकास बेड्या

नाशिक (प्रतिनिधी): शहरात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

म्हसरूळ येथील निवासी वस्तीगृहात राहणाऱ्या आदिवासी शाळकरी मुली सोबत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे या वस्तीगृहाच्या संचालकानेच हे संतापजनक कृत्य केल्याचे समजते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्या बसला कानपूरजवळ अपघात; एकाचा मृत्यू

याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नाराधामा विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हसरुळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील माने नगर परिसरात हा प्रकार घडला आहे.

या घटनेने नाशिक हादरले आहे. द किंग फाऊंडेशन संचालित आधाराश्रमातील हा धक्कादायक प्रकार आहे. आश्रमात बेघर आणि गरीब कुटुंबातील ३० हून अधिक मुले मुली वास्तव्यास आहेत. याच निवासी वसतिगृहामध्ये राहणाऱ्या शाळकरी मुलीवर ३० वर्षीय संचालकानेच बलात्कार केल्याचं समजतंय. दरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच संशयित हर्षल बाळकृष्ण मोरे यास ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याला आता कोर्टात हजर देखील करण्यात आलेला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेबाबत महत्वाची अपडेट…

मुलीच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलीसोबत असा प्रकार घडल्याने नाशिक पुन्हा हादरले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790