धक्कादायक: नाशिकमध्ये युवतीच्या गाडीच्या डिक्कीत आढळला गावठी कट्टा

धक्कादायक: नाशिकमध्ये युवतीच्या गाडीच्या डिक्कीत आढळला गावठी कट्टा

नाशिक (प्रतिनिधी): नाशकात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्जधारक तरुणीकडे कर्ज वसुलीकरिता गेलेल्या फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीला तरुणीच्या गाडीच्या डिक्कीत गावठी कट्टा सापडला.. ही खळबळजनक घटना रविवारी (दि. १३) रोजी काठे गल्ली परिसरात घडली.

घटनेने परिसरात खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आलंय. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी संशयित युवतीला ताब्यात घेतले असून तिच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.

या युवतीने गावठी कट्टा कुठून आणला तसेच तो बाळगण्याचे कारण काय याचा पोलीस तपास करत आहेत.

👉 हे ही वाचा:  नाशिक: रिक्षाचालकाचा 3 प्रवाशांवर प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित युवती काठे गल्ली परिसरात असलेल्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहे. युवती हि खासगी जॉब करते. तिने बँक फायनान्स कडून कर्ज घेत गाडी खरेदी केली होती. कर्ज थकले असल्याने फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी काटे गल्ली येथील तरुणीच्या फ्लॅटमध्ये आले होते थकीत कर्ज भरा अथवा गाडी जमा करा असे या प्रतिनिधींनी सांगितले. यावेळी युवतीच्या गाडीच्या डिक्कीत गावठी कट्टा आढळून आला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: कंटेनरवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात तरूण ठार

काठे गल्ली येथे एका अपार्टमेंटमध्ये राहाणाऱ्या २५ वर्षीय तरुणीने दुचाकी विकत घेतली आहे. या दुचाकीचे कर्ज थकले असल्याने फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी काठे गल्ली येथील तरुणीच्या फ्लॅटमध्ये आले होते.

थकीत कर्ज भरा, अथवा गाडी जमा करा असे या प्रतिनिधींनी सांगीतले तिने गाडी घेऊन जाण्यास सांगितली. फायनान्सच्या प्रतिनिधींनी गाडीची डिक्की उघडली असता त्यांनी तत्काळ याबाबत पोलिसांना कळवले. काही वेळातच भद्रकाली पोलिस ठाण्याचे बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी युवतीला ताब्यात घेतले. आणि तरुणीची दुचाकी व गावठी कट्टा जप्त केला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 16 जुलै रोजी आयोजन

दरम्यान, संशयित तरुणीला पोलिसांनी या कट्ट्याबाबत विचारणा केली असता तिने घरात साफसफाई करताना बंदूक मिळून आल्याचे सांगितले. मात्र या बंदुकीचा परवाना तिच्याकडे नसल्याने तरुणी खोटे बोलत असल्याचा पोलिसांना संशय आहे.. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790