नाशिक: नामांकित ज्वेलर्सच्या दुकानात सेल्समननेच मारला सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला
नाशिक (प्रतिनिधी): ज्वेलरीच्या दुकानात काम करणाऱ्या सेल्समननेच दुकानातून तब्बल अडीच लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे…
त्याच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वैभव अशोक भंडारी (४३,रा. फ्लॅट नंबर ५, भंडारी रेसिडेन्सी वेद मंदिराच्या मागे तिडके कॉलनी,नाशिक) यांचे कालिका मंदिराच्या बाजूला भंडारी ज्वेलर्स गॅलेक्सी प्रा.ली. शोरूम नावाने दुकान आहे.
दुकानात सेल्समन म्हणून काम करत असलेला संशयित अरुण रामदास महाजन (रा. वनराज रेसिडेन्सी फ्लॅट नंबर १, वनविहार कॉलनी, नाशिक) याने मार्च २०२२ ते २१ सप्टेंबर २०२२ या काळात त्यांच्या दुकानातील तब्बल २ लाख ४३ हजार २४१ रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले अशी तक्रार भंडारी यांनी दिली आहे. संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी भंडारी यांच्या फिर्यादीवरून महाजन याच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर.व्ही.सोनार करत आहेत.