पतीचा खून करून पत्नी फरार; नाशिकमधील धक्कादायक प्रकार
नाशिक (प्रतिनिधी): वडाळा गावातील माळी गल्ली- कोळीवाडा परिसरातील खोलीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात कुजलेल्या अवस्थेतील इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.
शनिवारी (ता. २४) रात्री उघडकीस आली आहे.
घरगुती भांडणातून पतीचे हातपाय बांधून टॉवेलने त्याचा गळा आवळून व धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना वडाळा गावात घडली.
पती मृत झाल्याची खात्री होताच आरोपी पत्नीने तेथून धूम ठोकली.
दिलीप रंगनाथ कदम (वय 49, रा. माळीगल्ली, वडाळागाव, नाशिक) असे मृताचे नाव असून त्याचीच पत्नी नंदाबाई दिलीप कदम (वय 36) हिने केल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून घरातून दुर्गंधी येत असल्याने ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
- नाशिक: प्रेमासाठी बुरखा घातला आणि मार खाल्ला; बुरखा घालून प्रेयसीला भेटणे पडले महागात!
- नाशिक: पैशांची बॅग पळवायला आले, मात्र मुलं चोरणारे समजुन जमावाकडून चोप
- Ad: Find Best Pest Control In Nashik City.
पाेलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कदम कुटुंब माळी गल्लीत वास्तव्यास आहे. त्यातील दिलीप हे पंचवटीतील गणेशवाडीत गॅरेज मॅकेनिक आहे. काल दिलीप यांच्या घरातून उग्र वास येत हाेता. शेजारी राहणाऱ्या लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घराची पाहणी करताच दिलीप यांचा मृतदेह दोरीने हातपाय बांधून पोटावर व डोक्याच्या मागे शस्त्राने वार केलेल्या अवस्थेत आढळला.
या प्रकरणी रोशन कदम यांच्या फिर्यादीवरून नंदाबाई कदम विरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.