नाशिक: प्रेमासाठी बुरखा घातला अन् मार खाल्ला; बुरखा घालून प्रेयसीला भेटणे प्रियकराला पडले महागात
नाशिक (प्रतिनिधी): बुरखा घालून प्रेयसीला भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका प्रेमवेड्याला जमावाने मुले पळवणारा समजून बेदम मारहाण केल्याची घटना नाशिक शहरात घडली आहे.
हा तरुण आपल्याच भागातील आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून आला होता.
त्याची चलाखी एका पानटपरी चालकाच्या लक्षात आली आणि व्हायचे तेच झाले.
परिसरात मुले पळवणाऱ्या टोळीची अफवा पसरल्याने हा तरूण या टोळीचा सदस्य असल्याचे पानटपरी चालकाला वाटले. त्यानंतर त्याने एकच आरडाओरडा केल्याने या तरुणाची जमावाने येथेच्छ धुलाई केली.
काय आहे घटना?:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा परिसरात राहणारा एक तरुण नेहमी त्याच्या प्रियेसीला भेटण्यासाठी बुरखा घालून येत होता. दुपारी नेहमी प्रमाणे तो बुरखा घालून तरुणीच्या घरा जवळ आला. मात्र तरुणीच्या घराच्या जवळ गर्दी झाल्याने हा तरुण एका पानटपरीच्या जवळ उभा राहिला. बराच वेळ एक महिला बुरख्या उभी असल्याने पानटपरी चालकाने या महिलेला विचारले. महिलेले काही उत्तर दिले नाही. पानटपरी चालकाचे लक्ष महिलेच्या पायाकडे गेले. पायात जेन्टस बुट असल्याचे पानटपरी वाल्याने पाहिले. त्याने ओळखीच्या नागरिकास सांगीतले. त्या नागरिकाने बुरखा घातलेल्या तरूणाला नाव विचारले असता त्याने बोलण्यास नकार दिला. नागरिकांना हा तरूण चोर असल्याचा संशय आला व त्यांनी मुलाला मारहाण केली.
पोलिसांमुळे वाचला:
नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक अनिल शिंदे हे शासकीय वाहनातून जात असतांना त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांना जमावाला शांत करत तरुणाची सुटका केली. इंदिरा नगर पोलिसांना हा प्रकार कळवला. तरुण हा त्याच परिसरातील असून त्याचे बिंग फुटू नये म्हणून तो बुरखा घालून तरुणीली भेटण्यास येत होता. त्याने अखेर पर्यंत तोंड दाखवले नाही. मात्र पोलिसांना सर्व प्रकार कथन केला.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790