नाशिक: त्र्यंबकच्या संत निवृत्तीनाथांचे दर्शन घेता येणार नाही, मंदिर 15 सप्टेंबर पर्यंत बंद

नाशिक: त्र्यंबकच्या संत निवृत्तीनाथांचे दर्शन घेता येणार नाही, मंदिर 15 सप्टेंबर पर्यंत बंद

नाशिक (प्रतिनिधी): केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून प्रसाद योजनेअंतर्गत येथील श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर परिसरात विविध विकास कामे सुरू असल्याने भक्ता आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढील पंधरा दिवस श्री निवृत्तीनाथांचे मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे भाविकांनी चौकशी करून दर्शनासाठी यावे असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ मंदिर प्रसिद्ध आहे. यंदा आषाढी वारीसाठी लाखो भाविक त्र्यंबकेश्वरी दाखल होते. त्यानंतर आता मंदिराच्या विविध कामासाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.

31 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात नित्य नैतिक पूजा आजच्या व इतर कार्यक्रम नियमाप्रमाणे सुरू राहतील असे मंदिर प्रशासनासह संबंधित यंत्रणेने कळवले आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर जिर्णोद्धार पूर्ण झाला.

त्यानंतर त्यावर सोन्याचा कळस चढवला गेला. आता प्रसाद योजनेतून 11 कोटींची विकास कामे येथे होत असून याचसाठी मंदिराच्या बाजूस असलेल्या इमारतीचे पाडकाम सुरू झाले आहे.

सद्यस्थितीत पाडकाम सुरु असल्याने मंदिर परिसर मोकळा झाला आहे. संत निवृत्तीनाथ मंदिर परिसरातुन इतर ठिकाणचा परिसर खुलून दिसून लागला आहे. मंदिर शिल्प आता खुले झाले असून आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. मंदिर परिसर विकास आराखड्यामध्ये सभा मंडप प्रदक्षिणा मंडप भाविकांसाठी प्रतिक्षालय आणि सामान घर व पायखाना प्रस्तावित आहेत दर्शनबारी चार देशांना चार भव्य दरवाजे सभामंडप पूर्ण दगडी बांधकामात व छतावर दगडी कोरीव कामाचे छत असा सुरेख प्रकल्प साकार होणार आहे प्रामुख्याने भजन कीर्तन यासाठी खुले अंगण आणि बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

जिल्हयातील धार्मिक स्थळांमध्ये त्र्यंबकेश्वर येथील संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचे अनन्यसाधारण महत्व आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी लिन होण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. राज्यातील वारकरी संप्रदायासाठी निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर एक ऊर्जास्थान आहे. मंदिर आणि मंदिराच्या परिसराचा हवा तसा विकास झालेला नव्हता, त्यामुळे या मंदिराच्या विकासासाठी त्याचा केंद्राच्या प्रसाद योजनेत समावेशाला केंद्रीय पर्यटन विभागाने तत्‍वतः मान्यता दिली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790