नाशिक: आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू

नाशिक: आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा इलेक्ट्रिकचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे..

ग्रीष्मा विकास कुलकर्णी असे या चिमुकलीचे नाव आहे.

हि सर्व घटना मेडिकल मध्ये असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विशाल कुलकर्णी हे परिवारासोबत नाशिक मधील उंटवाडी येथे राहतात.

हे ही वाचा:  नाशिक: चोरीच्या ४ मोटार सायकलसह २ चोरटे गजाआड

विशाल यांचा नाशिकमध्ये खाजगी व्यवसाय आहे. गुरुवारी (दि. १ ऑगस्ट) घरी आल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांसोबत गणपती बाप्पाची आरती केली. यानंतर ग्रीष्माने वडिलांकडे आईस्क्रीम खाण्याची इच्छा व्यक्त केली..

वडील तिला जवळच असलेल्या एका मेडिकल स्टोअरमध्ये घेऊन गेले. या मेडिकलमध्ये आईस्क्रीमचे मोठे फ्रीज आहे. आईस्क्रीम मिळण्याचा आनंद ग्रीष्माला होता. फ्रीजर मधील आईस्क्रीमचे मधून फ्लेवर निवडण्यासाठी तिने फ्रीज मध्ये डोकावण्याचा तिने प्रयत्न केला.

हे ही वाचा:  नाशिक: खुनातील संशयित 14 महिन्यांनंतर ताब्यात; सिडकोतील 'या' मृत्यूप्रकरणाचा उलगडा !

मात्र फ्रीजची उंची तिच्या पेक्षा जास्त असल्याने आईस्क्रीमसाठी तिने पाय फ्रिजरच्या ब्रॅकेट वर ठेवले आणि फ्रिजरच्या वायरचा ब्रकेट मध्ये उतरलेला इलेक्ट्रिक करंट ग्रीष्माला लागला आणि ती जागेवरच कोसळत बेशुद्ध झाली. ग्रीष्माला उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

विविध शहरांमध्ये आईस्क्रीम फ्रीजर सहसा दुकानाच्या बाहेर ठेवण्यात येतात. त्यांची रात्री सुरक्षा व्हावी यासाठी त्यांना लोखंडी ब्रॅकेट तयार केले जाते. मात्र या फ्रिजरच्या खाली असलेलं फ्रिजर जाळीचा करंट बऱ्याच वेळेस ब्रॅकेट मध्ये उतरलेला असतो अनेक वेळेस शूज किंवा चप्पल घातलेली असल्यामुळे हा करंट लागत नाही. मात्र कडेवरून उतरून लहान मुले अनवाणी पायाने इथे गेले असताना शॉक लागतो. त्यामुळे अशावेळी बाहेर ठेवलेल्या फ्रिजरची तपासणी वेळोवेळी होण्याची गरज आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790